शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘मोहिनी’ बनून काँग्रेस आमदाराला आकर्षित करत होता युवक; मध्यरात्री अश्लिल व्हिडिओ कॉल केला, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 11:56 IST

काँग्रेस आमदार नीरज दीक्षित यांनी २२ तारखेला गढी मलहरा येथे पोहचून या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.

ठळक मुद्देएक महिला बनून युवक कॉंग्रेसचे आमदार नीरज दीक्षित यांना ब्लॅकमेल करत होताछतरपूर पोलिसांनी आरोपी युवकास राजस्थानातून अटक केलीमध्यरात्री या युवकाने एका आमदाराला बाई म्हणून फोन केला

छतरपूर – काँग्रेस आमदार नीरज दीक्षित प्रकरणात छतरपूर पोलिसांनी नवा खुलासा केला आहे. आमदाराला अर्ध्या रात्री एक व्हिडीओ कॉल आला होता. या व्हिडिओ कॉलमध्ये आमदारासमोर महिला अश्लिल कृत्य करू लागली. त्यानंतर अश्लिल व्हिडीओ पाठवून ती महिला आमदाराला ब्लॅकमेल करू लागली होती. याला कंटाळून आमदारानं पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसात तपासात राजस्थानच्या युवकाला अटक करण्यात आली. हा युवकच महिलेच्या आवाजात आमदाराला फोन करत असल्याचं उघड झालं. काँग्रेस आमदार नीरज दीक्षित यांनी २२ तारखेला गढी मलहरा येथे पोहचून या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. एफआयआरमध्ये आमदार नीरज दीक्षित यांनी सांगितले की, एक महिलेने अर्ध्या रात्री मला अश्लिल व्हिडिओ कॉल केला. सकाळी ब्लॅकमेल करत पैशांची मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता राजस्थानातून एका युवकाला अटक करण्यात आली.

छतरपूर पोलीस अधिकारी शशांक जैन यांनी सांगितले की, आमदाराला ब्लॅकमेलिंग करण्याच्या प्रकरणाचा तपास एसपी सचिन शर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली पथक तयार करून करण्यात आलं. सायबर सेलच्या माध्यमातून या तपास पथकाने आमदाराला ज्या नंबरवरून कॉल आला आणि मेसेज आला त्याची माहिती काढली. त्या तपासात संबंधित मोबाईल क्रमांक राजस्थानाहून ऑपरेट होत असल्याचं कळालं. त्यानंतर पोलिसांचे एक पथक राजस्थानला पाठवण्यात आलं.

याठिकाणी सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. जेव्हा पोलिसांनी या आरोपीची कसून चौकशी केली तेव्हा धक्कादायक सत्य उघड झालं. आरोपीनं जबाबात म्हटलं की, तो मुलीचा आवाज काढून लोकांशी बोलतो. एका रेकॉर्डेड अश्लिल व्हिडीओ करून संबंधित व्यक्तीला कॉल केला जातो. जेव्हा ती व्यक्ती जाळ्यात अडकते तेव्हा त्याला ब्लॅकमेलिंग करण्याचं काम सुरू होतं असा त्याने खुलासा केला आहे.

मुलगी समजून लोकं फसतात

बहुतांश लोक मुलीचे अश्लिल कृत्य आणि बोलण्याचा अंदाज यावरून समजून जातात. त्यानंतर सहजपणे ते जाळ्यात फसतात. आतापर्यंत २१ लोकांना फसवून त्यांच्याकडून १४ लाख रुपये ब्लॅकमेलिंग वसूल केले आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. या लोकांनी ज्यांना फसवलं आहे त्यांचा शोध सुरू आहे. मध्य प्रदेशातही मागील काही दिवसांत अशीच प्रकरणं समोर आली होती. अश्लिल व्हिडिओ पाठवून लोकांना जाळ्यात ओढलं जायचं आणि त्यांना लुटण्याचे काम सुरू होते.  

 

टॅग्स :Policeपोलिस