शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित प्रेयसीसोबत चुंबन घेताना युवकानं व्हिडीओ पोस्ट केला अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 17:34 IST

Ujjain kissing a couple who ran away from home : दोघांना पकडून महाकाल पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महाकाल पोलीस ठाण्यात दोघांची चौकशी केली असता एक विचित्र किस्सा समोर आला.

उज्जैन : पवित्र शिप्रा नदीत स्नान करण्यासाठी देशभरातून भाविक उज्जैनमध्ये येतात. या शिप्रा नदीत भोपाळच्या एका जोडप्यावर अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. रामघाटावर कर्तव्यावर असलेले सुनील पंथी यांनी सांगितले की, रामघाटावर एक महिला व तरुण अश्लील कृत्य करत असल्याची माहिती काही लोकांमार्फत मिळाली होती. त्यानंतर दोन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी काही जुमानले नाही. यानंतर दोघांना पकडून महाकाल पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महाकाल पोलीस ठाण्यात दोघांची चौकशी केली असता एक विचित्र किस्सा समोर आला.दोन मुलांच्या आईसह भोपाळहून पळून तरुण उज्जैनला आला होता 

ब्रज असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा भोपाळचा असून दोन मुलांच्या आईसह भोपाळहून पळून तो उज्जैनला आला होता. यादरम्यान तिने इन्स्टाग्रामवर फिल्मी गाण्यांसह एक अश्लील व्हिडिओ पोस्ट केला. दोघींना अश्लील कृत्य करताना पाहून हळुहळू घटनास्थळी लोकांची गर्दी जमू लागली. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडले.जोडप्याला भोपाळ पोलिसांच्या ताब्यात दिलेसुरुवातीला ब्रजने तरुणीला पत्नी असल्याचे सांगितले, मात्र पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याच्या तोंडून सत्य बाहेर आले. त्याने विवाहितेला घरातून पळवून आणल्याचे सांगितले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या दोघांनीही हा अश्लील व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना पोस्ट केला होता. हा व्हिडिओ महिलेच्या पतीपर्यंतही पोहोचला होता. दोघेही प्रौढ असल्याने पोलीस कोणतीही औपचारिक कारवाई करू शकले नसले तरी भोपाळमध्ये दोघांवर बेपत्ता झाल्याची नोंद असल्याने त्यांना भोपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केलाब्रजने महिलेसोबत चुंबन घेतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. ते दोघेही राम घाटावर रासलीला करत आहेत, कोणाची हिंमत असेल तर त्यांना पकडून दाखवा, असेही त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. हे आव्हान ब्रज नावाच्या तरुणाने महिलेचा पती आणि इतर नातेवाइकांना दिले होते. मात्र, उज्जैन पोलिसांनी हे आव्हान स्वीकारून दोघांनाही ताब्यात घेतले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया