शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाच्या संशयातून तरुणाच्या भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 06:56 IST

भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७), असे मृताचे नाव असून त्याची आई अलकाबाई बाळासाहेब गायकवाड (४१) व वडील बाळासाहेब गंगाधर गायकवाड (४१) हे दोघे गंभीर जखमी आहेत.

वैजापूर (जि. औरंगाबाद) : प्रेमप्रकरणातून तरुणीचे अपहरण केल्याच्या संशयावरुन तरूणाच्या अल्पवयीन भावाचा तीक्ष्ण हत्याराने खून करून त्याच्या आई-वडीलांना मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.१४) रात्री तालुक्यातील लाख खंडाळा येथे घडली. भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७), असे मृताचे नाव असून त्याची आई अलकाबाई बाळासाहेब गायकवाड (४१) व वडील बाळासाहेब गंगाधर गायकवाड (४१) हे दोघे गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी देविदास छगन देवकर व त्याचा भाऊ रोहिदास छगन देवकर या दोघांना अटक केली असून खून व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेतील २० वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत शुक्रवारी दाखल झाली. भिमराजचा मोठा भाऊ अमोल बाबासाहेब गायकवाड याने प्रेमप्रकरणातून तिचे अपहरण केल्याचा संशय देवकर कुटुंबियांना होता. अमोलदेखील शुक्रवारपासून गावात नाही. अमोलचे कुटुंब लाख खंडाळा गावापासून सहा कि.मी. अंतरावरील वस्तीवर राहते तर देवकर यांचे घर लाख खंडाळा येथे आहे. तरुणीचे अपहरण झाल्याच्या संशयातून देविदास व रोहिदास हे दोघे तलवारीसारखे तीक्ष्ण हत्यार घेऊन शनिवारी रात्री आठच्या सुमारास वस्तीवर धडकले.बाहेर झोपलेल्या भिमराजवर हल्ला करुन दोघांनी त्याला ठार केले व नंतर आई वडीलांनाही जखमी केले. याप्रकरणी देविदास देवकर व रोहिदास देवकर या दोघांविरुद्ध खून व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.अंत्यविधी आरोपींच्या घराच्या ओट्यावर करा, अशी मागणी गायकवाड कुटुंबियांनी केली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर गायकवाड यांच्या वस्तीजवळ भिमराज याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद