अजबच! तरुणाने स्मशानभूमीतील लॉकर तोडून चोरल्या अस्थी, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 08:57 PM2021-09-20T20:57:09+5:302021-09-20T20:58:05+5:30

Haryana News: हरियाणामधील हिसार जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. येथे एका तरुणाने स्मशानभूमीतील लॉकर तोडून त्यामधील अस्थी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

The young man broke the locker in the cemetery and stole the bones, then ... | अजबच! तरुणाने स्मशानभूमीतील लॉकर तोडून चोरल्या अस्थी, त्यानंतर...

अजबच! तरुणाने स्मशानभूमीतील लॉकर तोडून चोरल्या अस्थी, त्यानंतर...

Next

हिसार - हरियाणामधील हिसार जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. येथे एका तरुणाने स्मशानभूमीतील लॉकर तोडून त्यामधील अस्थी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना हिसार जिल्ह्यातील सेक्टर १६-१७ मधील सिव्हिल लाईन ठाण्याजवळील स्मशानभूमीत घडली. येथे एका तरुणाने लॉकर तोडून ईश्वरी देवी नावाच्या महिलेच्या अस्थींची चोरी केली. त्यानंतर कालव्याजवळ जाऊन डब्यातून अस्थी काढून त्या अस्थींचे विसर्जन केले आणि हा तरुण घरी निघून गेला. दरम्यान, या प्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसांकडे कारवाईची मागणी केल्यावर पोलिसांनी कलम ३८०, ४५४, २९५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. (The young man broke the locker in the cemetery and stole the bones)

दरम्यान, पोलिसांनी आरोपीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी बालसमंद कालव्यामधून विसर्जित अस्थी आणि डबा पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी तरुणाची ओळख केमरी रोड स्थित माल कॉलनीमधील रहिवासी अनिल अशी पटली आहे. त्याच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार तो मानसिक दृष्ट्या आजारी आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये पीडित नरेश कथुरिया यांनी सांगितले की, १२ सप्टेंबर रोजी त्यांची आई ईश्वरी देवी हिचे निधन झाले होते. तिच्यावर सेक्टर १६-१७ सिव्हिल लाईन ठाण्याजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ९ दिवसांनी अस्थिविसर्जनासाठी हरिद्वारला जायचे होते. त्यासाठी या अस्थी डब्यामध्ये भरून स्मशानभूमीतील लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. 

Web Title: The young man broke the locker in the cemetery and stole the bones, then ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.