शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 22:50 IST

मारहाणीमुळे तरुणाला आठ दिवस घरातच रहावे लागले, दहशत माजविण्यासाठी सहा गुंडांनी केली मारहाण

ठळक मुद्देव्हायरल व्हिडिओच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने मारहाण झालेल्या तरुणाचा शोध घेतला.विकीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यासह चौघांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठाणे - वागळे इस्टेट परिसरात आपली दहशत माजविण्यासाठी सहा गुंडांनी मिळून एका तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडिओ देखिल बनविण्यात आला. हाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तक्रार दाखल होण्यापूर्वीच यातील आकाश शाहू (22, रा. किसननगर, ठाणे) याला अटक केल्याची तर दुसऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी बुधवारी दिली. यातील अन्य चौघांचा अद्यापही शोध घेण्यात येत आहे.

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना ठाण्यातील किसननगर भागात अलिकडेच घडली. एका तरुणाला बेदम मारहाण करुन त्याला विवस्त्र करीत त्याचा व्हिडिओ आकाश याच्यासह सहा जणांच्या टोळक्याने बनविला होता. तो व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर व्हायरलही केला. त्याला इतकी बेदम मारहाण करण्यात आली की, आठ दिवस तो घराच्या बाहेरही पडू शकला नाही. त्यामुळे त्याने पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली नाही. मात्र, याच व्हायरल व्हिडिओच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने मारहाण झालेल्या तरुणाचा शोध घेतला. त्याची चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. 20 जून रोजी हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याआधी 13 जून रोजी ही घटना घडली. विकी भोसले या कुख्यात गुंडाची दहशत कायम राहण्यासाठी पूर्ववैमनस्यातून त्याच्या साथीदारांनी या तरुणाला बेदम मारहाण केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

 

विकीच्या विरोधात असलेल्या सागर रावलसोबत हा मारहाण झालेला तरुण असायचा. याच रागातून हा वचपा काढल्याचे बोलले जाते. मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी 22 जून रोजी ताब्यात घेतले आहे. त्यातील एक अल्पवयीन आहे. व्हिडिओमध्ये मारणारी मुले पीडित मुलाला  ‘विकी भोसले बॉस आहे’ असे जबरदस्तीने म्हणायला भाग पाडत आहेत. त्याचवेळी  त्याला बेदम मारहाणही करीत आहेत. पोलिसांनी आता या प्रकरणांमध्ये दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील सर्व आरोपींविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यासह चौघांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

टॅग्स :PoliceपोलिसthaneठाणेArrestअटक