कॉलेजमधून तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार, तरुणाला अटक

By विवेक भुसे | Updated: September 10, 2023 16:44 IST2023-09-10T16:44:43+5:302023-09-10T16:44:58+5:30

पनवेल आणि बाणेर येथे ५ ते ७ सप्टेबर दरम्यान घडला प्रकार

Young girl kidnapped from college and tortured assaulted young man arrested | कॉलेजमधून तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार, तरुणाला अटक

कॉलेजमधून तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार, तरुणाला अटक

विवेक भुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: मैत्री असलेल्या तरुणीचे जबरदस्तीने अपहरण करुन तिला पनवेल, बाणेर येथे नऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तबरेज शेख (वय १९, रा. शिवाजी मार्केटजवळ, कॅम्प) याला अटक केली आहे. हा प्रकार पनवेल व बाणेर येथे ५ ते ७ सप्टेबर दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच कॉलेजमध्ये शिकत असून त्यांच्यात मैत्री आहे. आरोपीने फिर्यादीला काहीही न सांगता त्याच्या गाडीवर बसवून पुणे स्टेशन येथे घेऊन गेला. तेथून पनवले येथे नेले. तेथे लॉजवर तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर तिला बाणेर येथील लॉजवर आणून तेथेही तिच्याशी शारीरीक संबंध केले. तरुणीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तबरेज शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक बनसुडे तपास करीत आहेत.

Web Title: Young girl kidnapped from college and tortured assaulted young man arrested