शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला शिविगाळ प्रकरण : पॉप स्टार रेमो फर्नांडीस निर्दोष, पणजी बाल न्यायालयाचा निवाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 21:30 IST

पणजी: अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करण्याच्या प्रकरणात पॉप स्टार गायक रेमो फर्नांडीसला पणजी बाल न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे. सर्व आरोपातून त्यांना दोषमुक्त करण्यात आले आहे.रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीशी अत्यंत अर्वाच्छ शब्दात संवाद करण्याचे त्यांच्यावर पणजी बाल न्यायालयात आगशी पोलिसांनी आरोप ठेवले होते. या प्रकरणात अनेक सुनावण्या झाल्या होत्या व ...

पणजी: अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करण्याच्या प्रकरणात पॉप स्टार गायक रेमो फर्नांडीसला पणजी बाल न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे. सर्व आरोपातून त्यांना दोषमुक्त करण्यात आले आहे.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीशी अत्यंत अर्वाच्छ शब्दात संवाद करण्याचे त्यांच्यावर पणजी बाल न्यायालयात आगशी पोलिसांनी आरोप ठेवले होते. या प्रकरणात अनेक सुनावण्या झाल्या होत्या व रेमो फर्नांडीस यांनी न्यायालयातही उपस्थिती लावली होती. गुरूवारी या प्रकरणात निवाडा सुनावताना न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. १ डिसेंबर २०१५ रेमो फर्नांडीस यांचा मुलगा जोनाह याच्या कारला पर्वरी - म्हापसा रस्त्यावर अपघात झाला होता. या अपघातात एक महाराषट्रातून आलेली अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिच्या पायाचे हाड मोडले होते. तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता रेमो फर्नांडीस यांनी त्या ठिकाणी जाऊन मुलीला शिविगाळ केल्याची तक्रार अ‍ॅड. आयरीश रॉड्रिगीश् यांनी तक्रार नोंदविली होती. त्यानंतर पोलिसांनी गोवा बाल कायदा कलम २ व ८ अंतर्गत वाईट वागणूक देणे व शिविगाळ करणे या आरोपांखाली गन्हा नोंदविला होता. नंतर  त्याच कलमाखाली आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. ५३ पानी आरोपपत्रात २१ साक्षीदारांच्या साक्षीही नोंदविल्या होत्या. या साक्षिदारात आयरीश रॉड्रिगीश याचीही साक्ष होती. निरीक्षक उदय परब या प्रकरणाचे तपास अधिकारी होते. दरम्यान, न्यायालयाने सर्व आरोपातून निर्दोष मूक्त केल्यानंतर आनंद व्यक्त करताना रेमो यांनी  शेवटी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्याला बदनाम करण्याचे प्रयत्न फसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय