गडचिरोली - आई-वडीलांसह मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याची घटना सोमवारी दुपारी गडचिरोलीमधील आनंदनगर येथे घडली. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. तरुण मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा जबर मानसिक धक्का बसल्याने मुलीचे आई-वडील आणि भावाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. रवींद्र वरगंटीवार (52), वैशाली (46) आणि साहिल (19) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब मूळचे अमिर्झा या गावातील असून काही वर्षांपासून गडचिरोलीमधील आनंदनगर येथे भाड्याने राहात होते.
मुलगी प्रियकरासोबत गेल्याच्या धक्क्यातून आई-वडिलांसह भावाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 16:53 IST