शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

योगीच येणार! मिर्झापूरमध्ये गुजरात पोलीस म्हणाला, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 19:04 IST

Video Viral : हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मिर्झापूर पोलिसांनी या पोलीस कर्मचाऱ्याला ड्युटीवरून हटवले. तसेच कारवाई करण्यास सांगितले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी उत्तर प्रदेश पोलिसांसोबतच बाहेरूनही फौजफाटा बोलवण्यात आला आहे. यामध्ये गुजरातमधून मिर्झापूरला आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका वृद्धाशी बोलत असताना तो फक्त योगी येणार असल्याचे सांगत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मिर्झापूर पोलिसांनी या पोलीस कर्मचाऱ्याला ड्युटीवरून हटवले. तसेच कारवाई करण्यास सांगितले.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा एक भाग म्हणून, मिर्झापूरच्या पाच विधानसभांमध्येही सोमवारी मतदान होत आहे. दरम्यान, शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी एक ट्विट केले आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गुजरात पोलिसांचा एक कॉन्स्टेबल पोलिस बस पास करण्यासाठी इतर वाहने बाजूला करत आहे. दरम्यान, बसमध्ये बसलेला एक पोलीस रस्त्यावर उभ्या असलेल्या एका वृद्धाशी बोलत असताना म्हणतो की, गुजरातचे लोक थोडे विरोधात आहेत. यावर वृद्ध म्हणतो की, विरोधात का असू नये. नंतर योगीच यूपीत येणार असल्याचे पोलीस सांगतो. वृद्ध पुढे म्हणतो म्हणून तुम्ही आला आहेत का? यावर शिपाई म्हणतो की, हो म्हणूनच तो आला आहे आणि हसायला लागतो.योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मिर्झापूर-वाराणसी रस्त्यावरील नारायणपूरजवळ ६ मार्चचा आहे. योगेंद्र यादव यांनी हा व्हिडिओ ट्विट करत निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. मिर्झापूर पोलिसांनी ट्विट केले की, कॉन्स्टेबलला ड्युटी पॉईंटवरून हटवण्यात आले आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. एएसपी सिटी संजय कुमार वर्मा यांनी सांगितले की, गुजरात पोलिसांच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांचे कमांडंट संबंधित पोलिसावर कारवाई करत आहेत.

दावा भ्रामक आहे 

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये निवडणूक ड्युटीसाठी गुजरात पोलीस तैनात करण्यात आल्याचा दावा एका ट्विटमध्ये केला जात आहे. #PIBFactCheck या ट्विटर अकाऊंटवरून हा दावा दिशाभूल करणारा आहे. तसेच गुजरात पोलिसांची कोणतीही तुकडी निवडणूक ड्युटीसाठी वाराणसीत आली नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे असल्याचे नमूद केले आहे.

या व्हायरल व्हिडिओवरून राजकारणही तापले आहे. यावर राजकीय पक्षांनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केले आहेत. असेही बोलले जात आहे की, यूपी निवडणुकीत गुजरात पोलीस काय करत आहेत? मिर्झापूर येथील कच्छवन येथील माजी माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळा असलेल्या मतदान केंद्रावर स्लिप न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी बीएलओला घेराव घातला. स्लिप न मिळाल्याने लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. जोगीपूर, मंगळवारी, दर्दियां, पीरखान, केवटन वॉर्डात स्लिप वाटली गेली नसल्याचा आरोप आहे. स्लिप देण्याऐवजी बीएलओने घरी ठेवल्याचा आरोप लोक करतात. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बारैणी गावात बीएलओला घेराव घातला.

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकGujaratगुजरात