शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

डीएचएफएल प्रकरणी येस बँक संस्थापक राणा कपूरला ३० जानेवारीपर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 02:04 IST

मदन गोपाळ चतुर्वेदी आणि मेहुल ठाकूर अशी या आरोपींची नावे आहेत. मेहुल ठाकूर हा राज्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा पुतण्या आहे.

मुंबई : येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याला विशेष पीएमएलए न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली. डीएचएफएल प्रकरणी ईडीने मार्च २०२० मध्ये अटक केली होती. ईडीने ताबा घेईपर्यंत राणा कपूर तळोजा कारागृहात होता.

एचडीआयएलची दुसरी कंपनी मॅकस्टरप्रकरणी ईडीने राणा कपूरविरोधात आणखी एक ईसीआयआर नोंदविला आहे. त्यात आणखी दोन आरोपींचा समावेश आहे. मदन गोपाळ चतुर्वेदी आणि मेहुल ठाकूर अशी या आरोपींची नावे आहेत. मेहुल ठाकूर हा राज्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा पुतण्या आहे. जयेंद्र ठाकूर ऊर्फ भाई ठाकूर यांच्या घरी व विवा ग्रुपच्या कंपनीवर छापा टाकल्यावर ईडीने मेहुल ठाकूर व मदन गोपाळ चतुर्वेदी यांना २३ जानेवारी रोजी अटक केली. चतुर्वेदी व ठाकूर यांची चौकशी केल्यावर या प्रकरणाशी राणा कपूर याचा संबंध असल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली.मॅकस्टरही एचडीआयएलचीच कंपनी आहे. मॉरिशसच्या एका कंपनीच्या मालकांनी व एचडीआयएलने ही कंपनी स्थापली आहे. मॉरिशसच्या कंपनीची ७९ टक्के भागीदारी मॅकस्टरमध्ये आहे. 

उर्वरित भागीदारी एचडीआयएलची आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, एचडीआयएलने येस बँकेकडून २०३ कोटी रुपयांचे कर्ज घेताना त्यांची संपत्ती बँकेकडे तारण ठेवली. हे कर्ज नवीन प्रॉपर्टीच्या दुरुस्तीसाठी वापरले. मात्र, याची काहीही आवश्यकता नव्हती. हे कर्ज मुद्दाम उचलण्यात आले आणि एचडीआयएलचे कर्ज फेडण्यासाठी हे पैसे वापरले.

टॅग्स :Yes Bankयेस बँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय