शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीहून पळविलेली दीड वर्षाची मुलगी आईच्या स्वाधीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 08:51 IST

जेजुरी एस टी बसस्थानकावरुन पळून नेलेल्या दीड वर्षाच्या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

पुणे - जेजुरी एस टी बसस्थानकावरुन पळून नेलेल्या दीड वर्षाच्या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तब्बल ७ दिवसानंतर ही मुलगी सापडली आहे़ मुल होत नसल्याने एका जोडप्याने या मुलीचे अपहरण केले होते.सागर पांडुरंग खरात (मुळ गाव माळेगाव बुद्रुक, ता. बारामती, सध्या रा. कोलवडी ता़ हवेली) व त्याच्या पत्नीला अटक केली आहे. लग्नाला सात वर्षे झाले तरी मुलबाळ होत नसल्याने त्यांनी पाळत ठेवून या मुलीला पळवून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, लिला ऊर्फ सुरेखा विनोद भैसारे (वय ३५, रा़ जेजुरी) या तिची लहान मुलगी जान्हवी विनोद भेसारे (वय दीड वर्षे) हिला घेऊन नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी एस टी बसस्टँडला जात होत्या़ त्यावेळी कोणीतरी त्यांची नजर चुकवून मुलीला पळवून नेले.स्थानिक गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर एका पल्सरवरील संशयितावर पोलिसांनी सर्व लक्ष केंद्रीत केले. आरोपीचे फोटो बनवून त्याआधारे बातमीदारांमार्फत चौकशी करण्यास सुरुवात केली़ तेव्हा या आरोपीचे नाव सागर पांडुरंग खरात (मुळ गाव माळेगाव बुद्रुक, ता़ बारामती, सध्या रा़ कोलवडी ता़ हवेली) असे असल्याचे समजले. तो हडपसर येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला हडपसर येथून ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केल्यावर जान्हवी हिला कोलवडी येथे पत्नीकडे ठेवले असल्याचे सांगितले़ पोलिसांनी कोलवडीस जाऊन जान्हवीला ताब्यात घेतले व तिच्या आईच्या स्वाधीन केले़ लग्नाला ७ वर्षे झाल्यानंतरही मुळबाळ होत नसल्यामुळे जेजुरी बस स्टँडवर पाळत ठेवून त्यांनी जान्हवीला पळून नेले होते. सात दिवसाच्या तपासानंतर मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील या पथकाला बक्षीस जाहीर केले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, हवालदार चंद्रकांत झेंडे, मोरेश्वर इनामदार, राजू पुणेकर, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, राजू मोमीन, प्रमोद नवले, पुनम कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे