शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पिता-पुत्रांनी केल्या ३० घरफोड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 04:20 IST

वाटमारीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत तब्बल ३० गुन्हे उघड झाले.

यवतमाळ - वाटमारीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत तब्बल ३० गुन्हे उघड झाले. इतकेच नव्हेतर उमरखेडमधील पिता-पुत्राची अट्टल टोळी जेरबंद करून १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. यवतमाळ, उमरखेड, पुसद, महागाव या शहरामध्ये घरफोडी करणारी पिता-पुत्राची टोळी स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या हाती लागली. पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके पोफाळी पोलीस ठाण्यातंर्गत झालेल्या वाटमारीच्या गुन्ह्याचा तपास करताना अनिल दगडू काळे (३१) रा. आठवडी बाजार उमरखेड याला ३१ आॅक्टोबर रोजी अटक केली. त्याने पोलिसांचा बाजीराव पडताच यापूर्वी केलेल्या संपूर्ण गुन्ह्यांची कबुली दिली.मुख्य सूत्रधार अविनाश प्रकाश चव्हाण (२७), आकाश प्रकाश चव्हाण व त्यांचा पिता प्रकाश शेखर चव्हाण (५५) तिघेही रा. सिंचन कॉलनी उमरखेड , विकास भगाव बन (२१) रा. झाडगाव ता. उमरखेड अशी आरोपींची नावे आहेत. प्रकाश चव्हाण हा उमरखेड सिंचन विभागात चालक म्हणून कार्यरत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्य पणाला लावून या आरोपींकडून १६ लाख ७४ हजार रुपयांचे ४५७ ग्रॅम सोने, एक किलो ६० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. याशिवाय आरोपीने गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतूस, रोख ५० हजार रूपये असा १९ लाख ४ हजार ६८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके करत असल्याची माहिती एसपी एम. राज कुमार यांनी दिली.पत्रपरिषदेला अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख मुकुंद कु लकर्णी उपस्थित होते. या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक सूरज बोंडे, संदीप चव्हाण, फौजदार संतोष मनवर, नीलेश शेळके, सहायक फौजदार साहेबराव राठोड, ओमप्रकाश यादव, जमादार गोपाल वास्टर, मुन्ना आडे, विशाल भगत, हरीश राऊत, मोहम्मद ताज मोहम्मद जुनेद, सतीश गजभिये, सुरेंद्र वाकोडे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी