शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या कुजलेला मृतदेहाचे धागेदोरे अकोल्याशी जुळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 21:07 IST

वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आढळलेल्या महिलेच्या कुजलेल्या मृतदेहाचे धागेदोरे अकोला जिल्हाशी जुळले आहेत.

अमरावती : वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आढळलेल्या महिलेच्या कुजलेल्या मृतदेहाचे धागेदोरे अकोला जिल्हाशी जुळले आहेत. पोलिसांना महिलेच्या मृतदेहाजवळ अकोला येथील रेल्वे तिकीट मिळाल्याने ती महिला अकोला जिल्ह्यातील असण्याचा अंदाज पोलिसांचा आहे. वलगाव पोलिसांना काही दिवसांपूर्वी संतोष अंबाडकर यांच्या नया अकोला शिवारातील शेतात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाजवळ अकोला रेल्वे स्थानकाहून काढलेल्या तीन तिकीट आढळल्या. ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तीन दिवस मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवला होता. मात्र, तिची ओळख पटली नाही. तिसºया दिवशी मृतदेहाच्या शवविच्छेदनात त्या महिलेच्या अंगावर धारदार शस्त्रांच्या खुणा आढळून आल्या. वैद्यकीय अहवालावरून वलगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला. महिलेची हत्या करून तिचा मृतदेह फेकण्याचा आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्या दिशेने पोलीस यंत्रणा तपासकामी लागली आहे. महिलेजवळ आढळलेल्या तिकिटांच्या अनुषंगाने पोलिसांनी अकोला रेल्वेस्थानकावर चौकशी केली. तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. विशेष म्हणजे, पोलिसांना दोन व्यक्तींवर संशय असून, त्यांच्या चौकशीनंतर या हत्याकांडाचे चित्र स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आता या हत्याप्रकरणाचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.  मृत महिलेजवळ अकोला येथील तिकीट आढळून आल्या होत्या. त्या अनुषंगाने चौकशी सुरू असून, अद्याप महिलेची ओळख पटली नाही. परिणामी गुन्ह्याचा उलगडा झालेला नाही. - मोहन कदम, पोलीस निरीक्षक, वलगाव ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी