शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील ऊसतोड मुकादमाने महिलेला ठेवले ओलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 16:59 IST

कर्नाटकातील ऊसतोडणीसाठी पैसे घेऊन मजूर पुरविले नसल्याने चिडलेल्या मुकादमाने धारणी तालुक्यातील एका महिलेच्या ३५ वर्षीय मुलीला पळवून नेऊन ओलीस ठेवले. 

अमरावती - कर्नाटकातील ऊसतोडणीसाठी पैसे घेऊन मजूर पुरविले नसल्याने चिडलेल्या मुकादमाने धारणी तालुक्यातील एका महिलेच्या ३५ वर्षीय मुलीला पळवून नेऊन ओलीस ठेवले.  दरम्यान धारणी पोलिसांनी कारवाई करीत तिची सुटका केली. पोलीस सूत्रांनुसार, कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ साखर कारखान्याचा मजूर कंत्राटदार लकप्पा बिरादार याने धारणी तालुक्यातील राणीगाव येथील खानावळ चालविणारी महिला मुद्रिकाबाई गंगाराम तिडके (५८) हिच्या माध्यमातून ऊसतोडणीसाठी कामगारांचा शोध घेतला. करार करून त्यांना सहा लाख रुपये दिले. कामगारांनी मात्र जाण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या लकप्पाने साथीदारांसह २५ आॅक्टोबर रोजी थेट राणीगाव गाठले. मुद्रिकाबाईची मुलगी त्रिवेणी वैजनाथ नागरगोजे (३५) हिला चारचाकीत टाकून थेट कर्नाटकातील जंगलात घेऊन गेले. तेथ एका घरात डांबून ठेवण्यात आले. मुद्रिकाबाईने २८ आॅक्टोबर रोजी धारणी पोलिसांत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी तात्काळ बागलकोट जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व्ही.व्ही. ऋषांत यांच्याशी संपर्क साधला व त्यांना याप्रकरणी सहकार्य करण्याचे आवाहन केले.धारणीचे पोलीस उपनिरीक्षक राजू चव्हाण, नायक पोलीस कॉन्स्टेबल शंकर तायडे, शिपाई आशिष भावे, वैभव जायले यांचे पथक २८ रोजी रात्रीच कर्नाटकासाठी रवाना करण्यात आले. ९०० किमी अखंड प्रवास त्यांनी दोन रात्री व एका दिवसात पूर्ण करून मंगळवारी पहाटे तेथे दाखल झाले. दरम्यान, मोबाइल लोकेशनच्या आधारे अपहृत महिलेला बुधनी गावाच्या परिसरात कोंडून ठेवल्याचे समजले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुधनी येथील व्यंकप्पा यांच्या शेतातील घरावर छापा घालण्यात आला. यादरम्यान तेथे उपस्थित इसमाने पलायन केले. त्रिवेणी नागरगोजे हिला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्रिवेणीला घेऊन धारणी पोलीस बुधवारी रात्रीच्या सुमारास धारणी ठाण्यात पोहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती