शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सोफा कम बेडमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; पतीसह पोलिसांनाही बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 10:09 IST

दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरातील ओम रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये बी विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे सकाळी कामावर गेले

डोंबिवली : पूर्वेतील दावडी परिसरात राहणारी सुप्रिया शिंदे (वय ३३) हिची हत्या करून तिचा मृतदेह घरातील सोफा कम बेडमध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.  

सुप्रियाचा पती किशोर कामावर गेला होता, तर मुलगा शाळेत गेला होता. दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.३० च्या दरम्यान हत्येचा प्रकार घडला. आरोपी सुप्रियाच्या परिचयाचा असावा, असा अंदाज आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांत किशोर याच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची तीन ते चार पथके नेमली आहेत.

दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरातील ओम रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये बी विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे सकाळी कामावर गेले. त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मुलगा दुपारी १२.३० वाजता शाळेत गेला होता. सुप्रियाची तब्येत बरी नसल्याने शेजारी राहणाऱ्या महिलेला तिने मुलाला शाळेत सोडण्यास सांगितले. सायंकाळी ५.३० वाजता मुलगा शाळेतून घरी आला असता, दार वाजवूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला असता, सुप्रिया घरात कुठेही दिसली नाही. ही माहिती किशोरला देण्यात आली. त्यानेही नातेवाइकांकडे चौकशी केली, पण तिचा शोध लागला नाही. अखेर किशोरने पत्नी हरवल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, सोफा कम बेडवरील चादर विस्कटलेली दिसली. त्यामुळे त्यांनी तो उघडला असता, सुप्रिया हिचा मृतदेह सोफ्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळला. 

मोबाइल गायबसुप्रियाचा मोबाइल गायब झाला असून, तिच्या हरवलेल्या मोबाइलचा सीडीआर रिपोर्ट पोलिसांनी मागविला आहे. प्लास्टिकच्या दोन मोठ्या टॅगने तिचा गळा आवळण्यात आला आहे. तिच्या डोक्यावर गंभीर जखम आहे. प्रहार केल्यावर जमिनीवर उडालेले रक्त ज्या कापड्याने साफ केले, ते कापड घराच्या माळ्यावर सापडले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी