शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिला पदाधिकारी विनयभंग प्रकरण : वाहतूक सेनेचा प्रदेशाध्यक्ष पोलिसांना सापडेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 21:21 IST

माहेश्वरी अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.

ठळक मुद्देगणेशोत्सवाच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याने त्याला अटक करण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाही. संबंधित महिला पदाधिकारी ही पतीशी पटत नसल्याने ९ वर्षाच्या मुलासमवेत आई-वडीलांकडे रहाते.

मुंबई : महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग करणारा शिवसेना प्रणित वाहतूक सेनेचे राज्य अध्यक्ष दीपक माहेश्वरी आरसीएफ पोलिसांना मिळेना झाला आहे. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याने त्याला अटक करण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाही. त्यामुळे माहेश्वरी अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.संबंधित महिला पदाधिकारी ही पतीशी पटत नसल्याने ९ वर्षाच्या मुलासमवेत आई-वडीलांकडे रहाते. दीपक माहेश्वरीने तिला २५ मे रोजी त्यांनी तिची प्रदेश कार्यकारिणीत महत्वाच्या पदावर नियुक्ती केली. त्यानंतर २८ मे पासून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करु लागला. ६ जुनला एका कार्यक्रमाच्या जाण्यासाठी बोलावून गाडीत बसविले. त्यावेळी तिच्याशी शारीरिक छेडछाड केली. त्यानंतर पुन्हा अन्य पदाधिकाऱ्याच्यामार्फत तडजोड करण्यासाठी बोलाविले. त्यावेळी अश्लील शिवीगाळ करीत संबंध न ठेवल्यास गँगस्टरना सुपारी देवून तुझा मर्डर करु असे धमकाविले. याप्रकरणी तक्रार अर्ज दिल्यानंतरही तो मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे. शुक्रवारी रात्री याबाबत आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याला अटक झालेली नाही.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई