शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याने फोन करून बोलावले महिलेला; चाकूने सपासप वार करून केले गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 20:31 IST

Attempt to Murder : दिल्लीतील रोहिणी सेक्टर ११ मध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ठळक मुद्दे गुरुवारी रात्री ८. ३० वाजण्याच्या सुमारास शाहाबाद डेअरी पोलीस ठाण्याला याविषयी माहिती मिळाली होती.

दिल्लीत महिलेवरही चाकू हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेजाऱ्यानेच या महिलेला घराजवळ बोलावून हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून आरोपी शेजाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव नरेश उर्फ राजू आहे.

दिल्लीतील रोहिणी सेक्टर ११ मध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. २८ वर्षीय महिलेवर तिच्याच शेजाऱ्याने चाकू हल्ला केला. सपासप वार झाल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरुवारी रात्री ८. ३० वाजण्याच्या सुमारास शाहाबाद डेअरी पोलीस ठाण्याला याविषयी माहिती मिळाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. आरोपीने महिलेला फोन करुन घराबाहेर बोलावले होते. त्यावेळी भररस्त्यातच त्याने तिच्यावर चाकूने वार केले. पीडितेच्या नाकेवाईकांच्या माहितीनुसार आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची थरारक घटना दिल्लीमध्ये मंगळवारीच घडली होती. १९ वर्षीय तरुणावर चौघांनी भर रस्त्यात हल्ला केला होता. जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एकाच तरुणीवर असलेल्या प्रेमामुळे आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना ताजी असतानाच सदरची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcctvसीसीटीव्हीPoliceपोलिसArrestअटक