शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने १६ वर्षीय मुलाचे केले लैंगिक शोषण; पॉक्सोचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 20:55 IST

नेहरूनगर पोलिसांनी या महिलेवर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.  

ठळक मुद्दे कोर्टाने तिला २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.कुर्ला येथून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नेहरूनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. या महिलेने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप मुलाने केला आहे.

मुंबई -  कुर्ला येथे राहणाऱ्या ३८ वर्षांच्या विवाहित महिलेने १६ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. या महिलेविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टाने तिला २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.कुर्ला येथून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नेहरूनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. दरम्यान आरोपी महिला देखील बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने दाखल केली होती. नाश्‍ता करून येतो असे सांगून हा मुलगा २९ जुलैला सकाळी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर हे दोघे वांद्रे रेल्वे स्थानकात भेटले. तेथे या महिलेने त्याचा व  स्वत:चा मोबाईल आणि सिम कार्ड नष्ट केले. त्यानंतर ते दोघेही दिल्लीला गेले. तेथे घर मिळविण्यास अडसर येऊ लागल्याने ते गुजरातमधील वडोदरा आणि त्यानंतर नवसारीला आले. त्याठिकाणी ते दोघे ११ ऑगस्टपर्यंत राहिल्यानंतर ते पुन्हा मुंबईत आले.बेपत्ता होण्यापूर्वी हा मुलगा संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासात समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. हे दोघे कुर्ला येथे रेल्वे मार्गालगतच्या झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. या महिलेने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप मुलाने केला आहे. त्याच्या जबाबानुसार नेहरूनगर पोलिसांनी या महिलेवर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाWomenमहिलाsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटक