मुंबई : वर्सोव्यामध्ये महिलेला पाच वर्षे गुंगीसारखे औषध देत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 14 वर्षांपूर्वीचा असला तरीही आरोपीने पिडीत महिलेला तिचे फोटो नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपये उकळले आहेत.
याबाबतची तक्रार पिडीत महिलेने वर्सोवा पोलिस ठाण्यात केली आहे. ही महिला सध्या 36 वर्षांची आहे. आरोपीने तिच्यावर 2005 पासून 2009 पर्यंत गुंगीसदृष्य औषध पाजत वारंवार बलात्कार केला होता. सध्या या आरोपीचे वय 54 वर्षे आहे. या पिडीत महिलेच्या नकळत त्याने शरीरसंबंधांवेळचे फोटो काढले होते. हे फोटो या महिलेला दाखवून त्याने ते मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली होती.