मुंबई - वांद्रयांत पैशांच्या वादातून एका महिलेचा गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिमेतील लव्हली स्टोअरसमोर रिलायबल कन्स्ट्रक्शनचा रिकामा प्लॉट आहे. या प्लॉटवरील पत्र्याच्या रिकाम्या शेडमध्ये खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अर्चना असं मृत महिलेचे नाव असून साधारण ४० ते ४५ वर्षं वय असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका महिला आरोपीला आज पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
पैश्याच्या वादातून महिलेची गळा चिरून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 20:53 IST