शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Reels बनवायला पतीचा विरोध, पत्नीने गळा दाबून केली हत्या; भावाचा फोन आला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 15:57 IST

महेश्वर खरं तर कोलकाता येथे परतणार होता, परंतु कोलकाता येथे परतण्यापूर्वी त्याने सासरची भेट घेतली

बिहार : इंस्टाग्राम रील्स बनवण्यापासून रोखल्याच्या कारणावरून बिहारमधील बेगुसराय येथे एका महिलेने पतीची हत्या केली. ही महिला इंस्टाग्राम रील्ससाठी व्हिडिओ बनवत होती, ज्याला तिच्या पतीने विरोध केला. महिलेचा राग अनावर झाला आणि तिने घरच्या मंडळींच्या मदतीने त्याची हत्या केली. काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ही घटना खोडबंदपूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या फाफौत गावात घडली. महेश्वर कुमार रे असे मृताचे नाव असून तो समस्तीपूर जिल्ह्यातील नरहान गावचा रहिवासी आहे.  फाफौत गावातील असलेल्या राणी कुमारीने ६-७ वर्षांपूर्वी महेश्वरशी लग्न केले. महेश्वर हा कोलकाता येथे मजुरीचे काम करत होता आणि काही दिवसांपूर्वी तो आपल्या गावी परतला होता. त्याची पत्नी राणी कुमारी ही इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवत असे. ती सासरी असल्याचे कळताच तो फाफौत येथे तिच्या घरी गेला. 

इंस्टाग्राम रील्सवरून त्याचे आणि पत्नीमध्ये भांडण झाले. तिने घरच्यांच्या मदतीने महेश्वरचा गळा दाबून खून केला. मृताच्या भावाने रात्री उशिरा महेश्वरला कोलकाता येथून फोन केला आणि फोनवर कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तिने उत्तर दिले, तेव्हा ही घटना उघडकीस आली. भावाने त्याच्या वडिलांना ताबडतोब फाफौत गावात जाण्यास सांगितले, जिथे तो मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. 

महेश्वरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मृताच्या पत्नीला अटक केली. महेश्वर खरं तर कोलकाता येथे परतणार होता, परंतु कोलकाता येथे परतण्यापूर्वी त्याने सासरची भेट घेतली आणि त्याची पत्नी व सासरच्या मंडळींनी त्याची हत्या केली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारInstagramइन्स्टाग्राम