शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे महिला गंभीर; गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने अतिरक्तस्राव; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 13:50 IST

तपासणीत गर्भपाताच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने आणि अयोग्य प्रमाणात देण्यात आल्याचे स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, दिघी: बोगस डॉक्टरमुळे महिलेच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला गर्भपाताच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने दिल्याने अतिरक्तस्राव होऊन तिची प्रकृती चिंताजनक झाली आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष नारायणकर यांनी दिघी सागरी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुडगाव येथील एक महिला त्याच गावात असलेल्या शंकर कुंभार या व्यक्तीच्या दवाखान्यात गर्भपातासाठी गेली होती. त्यावेळी कुंभार याने वैद्यकीय चाचणी किंवा सोनोग्राफी न करता तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे अतिरक्तस्राव झाल्याने काही वेळाने महिलेची प्रकृती खालावली. त्यामुळे नातेवाइकांनी तिला तातडीने श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासणीत गर्भपाताच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने आणि अयोग्य प्रमाणात देण्यात आल्या होत्या, असे स्पष्ट झाले.

कारवाईची मागणी

श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. हे बोगस डॉक्टर  रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा प्रकार कुडगाव येथील घडलेल्या या घटनेमुळे समोर आला आहे. त्यामुळे अशा बोगस डाॅक्टरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शंकर कुंभार याने ‘सीएमएसईडी’ हा वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित कोर्स केला आहे. यामुळे काही औषधे देण्याची परवानगी आहे. मात्र, गर्भपाताच्या गोळ्या देणे, आपल्या नावासमोर डॉक्टर पदवी लिहिण्याची परवानगी नाही.  गर्भधारणेबाबत काही समस्यांसाठी शासकीय रुग्णालयात किंवा स्त्री रोगतज्ज्ञांकडे उपचार करावेत.-संतोष नारायणकर, तालुका वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :doctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारीpregnant womanगर्भवती महिला