शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

माथेफिरू रोमिओने तिच्या घरासमोरच बांधलं घर, साखरपुड्याच्या दिवशीचं केलं तिचं अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 14:55 IST

Hyderabad Crime News : घटनेदरम्यान शेजाऱ्यांनी लागोपाठ पोलिसांनी फोन करून याची सूचना दिली. तरीही पोलीस सीमेच्या बाहेर होते. गुंडांनी ओळख लपवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले होते.

Hyderabad: तेलंगणामधून अपहरणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे फिल्मी स्टाइलने डेंटल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या 24 वर्षीय तरूणीचं शुक्रवारी अपहरण करण्यात आलं. महत्वाची बाब म्हणजे काही वेळानेच तिचा साखरपुडा होणार होता. कार आणि ट्रकचा ताफा घेऊन आलेल्या काही गुंडांनी तरूणीच्या घराला वेढा दिला. साधारण अर्धा तास खूप गोंधळ घातला. ज्यात तिच्या वडिलांसहीत पाच लोकांनी गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर तरूणीचं अपहरण करण्यात आलं.

घटनेदरम्यान शेजाऱ्यांनी लागोपाठ पोलिसांनी फोन करून याची सूचना दिली. तरीही पोलीस सीमेच्या बाहेर होते. गुंडांनी ओळख लपवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले होते. मुख्य आरोपीचं नाव नवीन रेड्डी  आहे जो एका महागड्या वेबरेज मिस्टर टी चा मालक आहे. आरोपीने वैशालीला वरच्या मजल्यावरून खाली खेचत आणलं आणि तिला कारमध्ये बसवून फरार झाला. 

त्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत ऑपरेशन चालवलं आणि आठ गुंडांना अटक केली. मुख्य आरोपी नवीन अजूनही फरार आहे. वैशालीचा शोध सुरू होता. साधाऱण 8 तासांच्या शोधानंतर रात्री शहराच्या बाहेरील भागात तरूणी आढळून आली.

तरूणीचे वडील दामोदर रेड्डी म्हणाले की, 'माझ्या मुलीचा साखरपुडा दुपारी होणार होता. पण तिचं अपहरण करण्यात आलं. तिला 11 वाजता एका कारमधून नेण्यात आलं. डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्यावर मी बेशुद्ध झालो होतो. मी शुद्धीवर येईपर्यंत वैशाली गायब होती. परिवारातील अनेक सदस्यांना मारण्यात आलं'.

आरोप आहे की, पोलिसांनी त्यांच्या फोनला उत्तर दिलं नाही आणि त्यामुळेच गुंडांचं मनोबल वाढलं. नंतर आरोपीच्या चहाच्या दुकानाला काही लोकांनी आगीच्या हवाले केलं. रस्त्याही जाम करण्यात आला होता. वैशालीच्या घरची सगळी घटना एका सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली. कॅमेरात दिसत आहे की, गुडांनी तिच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारचीही तोडफोड केली. लोकांनाही धमकावलं.

एकतर्फी प्रेम

वैशालीच्या परिवारानुसार, त्यांची मुलगी नवीनला काही महिन्यांआधी एका स्थानिक बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये भेटली होती. नवीनने वैशालीच्या आई-वडिलांकडे तिच्यासोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली. वैशालीचे वडील म्हणाले की, मी माझ्या मुलीला याबाबत विचारलं तर तिने नकार दिला.  त्यानंतर नवीनने राजकीय नेत्यांच्या माध्यमातून दबाव टाकणं सुरू केलं. पण आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की, आम्हाला काही इंटरेस्ट नाही. यावर नाराज होऊन नवीनने वैशालीच्या घरासमोरच त्याच्या घराचं बांधकाम सुरू केलं. वैशालीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी चार्जशीट दाखल केली नाही.

दमोदर यांना तक्रार करण्याच्या अडचणी आठवल्या. राचकोंडाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुधीर बाबू हे महेश भागवत यांच्या अनुपस्थितीत प्रभारी आहेत त्यांनी वैशालीच्या आईसोबत बोलणी केली. त्यांनी मुलीच्या बचावाचं आश्वासन दिलं होतं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण