शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सोनमप्रमाणेच चैत्रालाही पतीला करायचे होते बाजूला; कर्नाटकातून आणखी एक भयानक प्रकरण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:05 IST

कर्नाटकात एका महिलेने अनैतिक संबधांतून पती, सासरे आणि मुलांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे.

Karnataka Crime: कर्नाटकमध्येही सोनम रघुवंशी प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सोनमप्रमाणेच प्रियकरासाठी विवाहित महिलेने पतीच्या हत्येसाठी कट रचल्याची घटना घडली. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. बंगळुरुतील या महिलेने तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी पती आणि मुलांपासून सुटका मिळवण्यासाठी एक भयानक कट रचला होता. मात्र तिला यात यश आले नाही आणि पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हसन जिल्ह्यातील चैत्रा नावाच्या या महिलेचे गजेंद्रशी ११ वर्षांपासून लग्न झाले होते आणि त्यांना आठ आणि दहा वर्षांची दोन मुले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैत्राचे पूर्वी पुनीत नावाच्या पुरूषाशी प्रेमसंबंध होते. मात्र समाजातील जेष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर दोघेही एकमेकांपासून दूर गेले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून चैत्राचे शिवू नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध सुरु झाले. कुटुंबातील सदस्य आपल्या प्रेमात अडथळा आणतील या भीतीने चैत्राने त्यांना संपवण्याचा कट रचला होता.

चैत्राने तिचा पती, मुले आणि सासू सासऱ्यांना जेवणात आणि कॉफीमध्ये विषारी गोळ्या आणि इतर पदार्थ टाकून संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र जेवणानंतर, कुटुंबातील लोकांना तीव्र पोटदुखीचा त्रास होऊ लागला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला डॉक्टरांना अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले. मात्र गजेंद्रला गैरप्रकाराचा संशय आल्याने त्याने बेलूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अधिक तपास केला असता चैत्राने विष कालवल्याचे समोर आलं. त्यानंतर चैत्रा आणि शिवू हे दोघेही फरार झाले. पोलिसांनी चैत्राला ताब्यात घेतलं तर शिवू फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,"२ जून रोजी, गजेंद्र नावाचा एक व्यक्ती बेलूर पोलिस ठाण्यात त्याची पत्नी चैत्र आणि शिवू नावाच्या व्यक्तीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाची तक्रार दाखल करण्यासाठी आला. गजेंद्र आणि चैत्र यांचे ११ वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. तो, त्याची पत्नी, त्याचे वडील आणि त्यांची मुले एका सुरक्षित घरात राहतात. चैत्राचे शिवूसोबत अनैतिक संबंध होते. तक्रारीनुसार चैत्राने तिचा पती, त्याचे वडील आणि त्याच्या मुलांना मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी विष पाजलं.

"तपासादरम्यान, असे आढळून आले की चैत्रा अन्नात विविध औषधे आणि पदार्थ मिसळत होती. आम्ही सध्या चैत्रची चौकशी करत आहोत. मिळालेल्या माहितीच्या आधारे, आम्ही शिवूलाही या प्रकरणात सह-आरोपी केले आहे," असे हसनचे पोलिस अधीक्षक मोहम्मद सुजीता यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिस