शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! भावजींचं कापलेलं शिर घेऊन मेव्हणा पोलीस ठाण्यात पोहचला तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 18:20 IST

गुरुवारी सकाळी सर्व पोलीस कर्मचारी आपल्या कामात व्यस्त असतानाच एक युवक हातात कापलेले शिर घेऊन पोलीस ठाण्यात पोहचला हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला

ठळक मुद्देबृजेश नावाच्या युवकाची हत्या केली आहे आणि त्याचे शरीर रामनगरा परिसरातील एका शेतात पडल्याचं सांगितले.पोलिसांनी तात्काळ या घटनेतील आरोपीला ताब्यात घेतला आणि घटनास्थळी रवाना झाले.बहिणीला घेऊन पळाल्यामुळे धीरज खूप संतापला होता, त्याने याचा बदला घेण्यासाठी बृजेशची हत्या केली

जबलपूर – मध्य प्रदेशातील जबलपूर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी मेव्हण्याने भावजींची निर्घृण हत्या केली आहे. याची माहिती मिळताच बहिणीनेही आत्महत्या केली आहे. हा संपूर्ण प्रकार ऑनर किलिंगचा असल्याचं सांगितलं जात आहे. जबलपूरच्या तिलवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

गुरुवारी सकाळी सर्व पोलीस कर्मचारी आपल्या कामात व्यस्त असतानाच एक युवक हातात कापलेले शिर घेऊन पोलीस ठाण्यात पोहचला हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला, आरोपी युवकाने पोलिसांना माहिती दिली की, त्याने बृजेश नावाच्या युवकाची हत्या केली आहे आणि त्याचे शरीर रामनगरा परिसरातील एका शेतात पडल्याचं सांगितले. पोलिसांनी तात्काळ या घटनेतील आरोपीला ताब्यात घेतला आणि घटनास्थळी रवाना झाले.

यावेळी बृजेशचा मृतदेह त्यांना आढळून आला, बृजेशची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली होती, त्याच्या डोक्यासह, हाताचेही कुऱ्हाडीने तुकडे करण्यात आले होते, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे, तर आरोपी धीरज शुक्लाला अटक केली आहे. माहितीनुसार, धीरज आणि बृजेश हे दोघं मित्र होते, दोघं दारूचा व्यवसाय करत होते, परंतु काही महिन्यापूर्वी बृजेश बर्मनसोबत धीरजची बहिण पूजाने पळून जाऊन लग्न केले.

बहिणीला घेऊन पळाल्यामुळे धीरज खूप संतापला होता, त्याने याचा बदला घेण्यासाठी बृजेशची हत्या केली, पोलिसांच्या माहितीनुसार, जवळपास ३ महिन्यानंतर पूजा आणि बृजेश घरी परतले होते, या संधीचा फायदा घेत धीरजने भावजी बृजेशचा काटा काढला, पण ही घटना इथेच संपली नाही तर ज्यावेळी याची माहिती मृत बृजेशची पत्नी पूजाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पूजाचा मृतदेहही ताब्यात घेतला आणि पोस्टमोर्टमसाठी पाठवला, पूजाचीही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांना आहे, पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरानंतर जबलपूरमध्ये खळबळ माजली आहे, ऑनर किलिंगचा हा प्रकार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

टॅग्स :Policeपोलिस