शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनाला सुन्न करणारी घटना! धावत्या एक्सप्रेससमोर आईनं ५ मुलींसह उडी मारून केली आत्महत्या, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 14:11 IST

माहितीनुसार, इमलीभांठा नदीजवळ रेल्वे ट्रॅकवर गुरुवारी सकाळी लोकांनी काही मृतदेह पडलेले पाहिले.

ठळक मुद्देपोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर रेल्वेलाही याची माहिती दिली त्यानंतर काही वेळ याठिकाणची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती.बेमचा येथील ४५ वर्षीय रहिवासी उमा साहू आणि तिचा नवरा केजराम यांच्यात अनेकदा वादविवाद व्हायचेबुधवारी संध्याकाळी केजराम दारू पिऊन घरी आला तेव्हा पत्नी उमा आणि त्याच्यात जोरदार भांडण झालं.

छत्तीसगडच्या महासमुंद येथे एका महिलेने आपल्या ५ मुलींसह बुधवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या सर्वांचे मृतदेह गुरुवारी सकाळी रेल्वे ट्रॅकच्या ५० मीटर अंतरावर विखुरलेले आढलले. मृतांमधील सर्व मुलांचं वय १० ते १८ या वयोगटातील होतं. दारूड्या नवऱ्यासोबत वारंवार वाद होत असल्याच्या कारणावरून महिलेने हे धक्कादायक पाऊलं उचचलं. सूचना मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले होते.

माहितीनुसार, इमलीभांठा नदीजवळ रेल्वे ट्रॅकवर गुरुवारी सकाळी लोकांनी काही मृतदेह पडलेले पाहिले. त्यानंतर त्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर रेल्वेलाही याची माहिती दिली त्यानंतर काही वेळ याठिकाणची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. बेमचा येथील ४५ वर्षीय रहिवासी उमा साहू आणि तिचा नवरा केजराम यांच्यात अनेकदा वादविवाद व्हायचे. केजराम याला दारूचं व्यसन होतं.

बुधवारी संध्याकाळी केजराम दारू पिऊन घरी आला तेव्हा पत्नी उमा आणि त्याच्यात जोरदार भांडण झालं. हा वाद आणखी वाढत गेल्यावर उमा संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पाच मुली त्यात अन्नपूर्णा, यशोदा, भूमिका, कुमकुम आणि तुलसीला घेऊन घराबाहेर पडल्या. त्यानंतर या सर्वांचा ठावठिकाणा लागला नाही. रात्री ९.३० च्या सुमारास लिंक एक्सप्रेससमोर या सर्वांनी उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

छिन्नविछिन्न अवस्थेत दूरपर्यंत पसरले मृतदेह

पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशीरा ही घटना घडली. महिला आणि ३ मुलींचा मृतदेह काही अंतरावर सापडले तर अन्य दोन मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडले होते. मृतदेहासोबत त्यांच्या चप्पलाही पडल्या होत्या. आसपासच्या लोकांची चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस