शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुलीसह महिलेने केली आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 09:49 IST

सहाव्या मजल्यावरून मारली उडी

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : नित्यानंदनगर भागातील सहा मजली इमारतीच्या गच्चीवरून सहा वर्षांच्या मुलीसह महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. रेखा देवासी (२८) आणि अंकिता (वय ६) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. महिलेच्या पतीने त्यांची पत्नी काही काळापासून मानसिकदृष्ट्या अस्थिर होती, अशी माहिती पाेलिसांना दिली आहे.

मीरा रोडच्या नित्यानंदनगर भागात गौरव गॅलेक्सी फेज १ ही सहामजली इमारत आहे. त्यात सुरेश हरिरामजी देवासी (३१) यांच्यासह रेखा आणि त्यांच्या दाेन मुली राहत हाेत्या. दुसऱ्या मुलीचे नाव पूजा (वय ३) आहे. सुरेश यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास रेखा यांनी मुलगी अंकिता हिच्यासह इमारतीवरून उडी मारली. ही घटना इमारतीच्या रखवालदाराने पाहताच त्यांनी सुरेश यांना कळवले. दोघींना रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. 

पोलिसांनी जबाब नोंदविले रेखा यांनी अंकिता हिला लिफ्टने सहाव्या मजल्यावर नेले. तेथून त्या गच्चीवर गेल्या. तीन वर्षांच्या दुसऱ्या मुलीला त्यांनी घरीच ठेवले होते. काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी व घरात पाहणी केली असून, या प्रकरणी संबंधितांचे जबाब नाेंदवण्यात येत असल्याचे सांगितले. 

पत्नी काही काळापासून मानसिकदृष्ट्या अस्थिर होती, असे महिलेच्या पतीने सांगितले आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.- संजय हजारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक 

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी