शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत मिळून पोटच्या पोराची केली हत्या, प्रेम प्रकरणात ठरत होता आडकाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 13:23 IST

ही आई प्रेमात इतकी आंधळी झाली होती की, तिने मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह नाल्याजवळ फेकून दिला.

आपल्या प्रेमात आडकाठी ठरत असलेल्या मुलाची आईनेच प्रियकरासोबत मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही आई प्रेमात इतकी आंधळी झाली होती की, तिने मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह नाल्याजवळ फेकून दिला. घटनेच्या २४ तासांनंतर गुरदासपूर पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केलीय. तसेच पोलिसांनी एका अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली.

रविवारी झंडा लुभाना येथील रहिवाशी त्रिलोचन सिंहने पोलिसांना माहिती दिली की, त्याच्या शेताजवळून जात असलेल्या नाल्यात एक अर्धवट जळालेला मृतदेह पडलेला आहे. याची माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. 

एसएसपी डॉ. नानक सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अज्ञात मृतदेहाची ओळख रणदीप सिंह ऊर्फ बॉबी (२६) अशी पटली आहे. या प्रकरणाच्या तपासातून समोर आलं आहे की, मृतकाची आई रूपिंदर कौरचं सुखविंदर सिंह याच्यासोबत गेल्या सहा महिन्यांपासून अफेअर सुरू होतं. रूपिंदर कौरनेच सुखविंदर सिंह आणि त्याचा मित्र गुरजीत कौरसोबत मिळून रणदीप सिंहची हत्या केली आहे. (हे पण वाचा : भावाला गुंडांसोबत राहू नको असा सल्ला दिला; नागपुरात भाजी विक्रेत्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न )

हत्या करण्याआधी रणदीपला त्याच्या आईने झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. त्यानंतर बेशुद्ध असतानाच आरोपींनी त्याच्यावर हातोडे आणि चाकूने सपासप वार करत त्याची हत्या केली. हत्या लपवण्यासाठी आऱोपींनी मिळून मृतदेह जाळला.

गावात रणदीप सिंह गायब असल्याची खबर आगीसारखी परसली होती. पोलीस आरोपी आई रूपिंदर कौरकडे गेले असता त्यांनी तिला सांगितलं की, ड्रेनेजजवळ एका तरूणाचा मृतदेह सापडला आहे. मृतकाची ओळख पटवण्यासाठी रूपिंदर सिंहला नेण्यात आलं. तेव्हा तिने मुलाचाच मृतदेह ओळखण्यास नकार दिला.

मृत रणदीप सिंह हा विवाहित होता. त्याची पत्नी परदेशात होती. तर एक भाऊ सैन्यात नोकरी करतो. वडिलही सैन्यातून निवृत्त होऊन आता एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात. (हे पण वाचा : पत्नीला खूश करण्याचा नाद भोवला, पठ्ठ्यानं १०० तोळ्याचा सुवर्ण हार बनवला;पोलिसांनी बोलावलं अन् डाव फसला)

मृत रणदीप सिंह याच्या खात्यात पाच लाख रूपये होते. त्याला त्याच्या पत्नीकडे कॅनडाला जायचं होतं. पण त्याची आई इतकी निर्दयी होती की गोड बोलून तिने त्याच्याकडून ते पाच लाख स्वत:च्या अकाउंटवर ट्रान्सवर करून घेतले. इतकंच नाही तर पैसे खात्यावर जमा झाल्यावर आई मुलासोबत विचित्र  वागू लागली होती. कारण मुलगा घरात असल्याने ती तिच्या प्रियकराला भेटू शकत नव्हती. त्यानंतर महिला आणि तिच्या प्रियकराने रणदीपला मार्गातून हटवण्याचा प्लॅन केला. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी