शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रंगला नाट्यमय थरार! पिस्तुलाच्या धाकावर ५० लाखांच्या खंडणीची मागणी; महिला-मुलीला ओलीस ठेवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 19:28 IST

Crime News : हुडकेश्वरमध्ये नाट्यमय घटना, परिसरात प्रचंड तणाव

ठळक मुद्दे हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिपळा फाटा परिसरात आज दुपारी ही नाट्यमय घटना घडली. आरोपीला पैसे घेण्याच्या बहाण्याने बाहेर काढण्याचे पोलीसांनी प्रयत्न केले. मात्र तो खिडकीतूनच पैशाची मागणी करीत होता.

नागपूर : पिस्तुल आणि चाकूच्या धाकावर घरातील महिला मुलीला  ओलीस ठेवून ५० लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिपळा फाटा परिसरात आज दुपारी ही नाट्यमय घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

पिपळ्यातील क्रिएटिव्ह कॉपरेटिव सोसायटी या बहुमजली इमारतीत बिल्डर राजू वैद्य यांचे निवासस्थान आहे. शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास बुरखा घालून असलेला आरोपी वैद्य यांच्या घरात शिरला. यावेळी वैद्य यांच्या घरात दोन महिला आणि एक मुलगी होती. आरोपीने घराची दारे खिडक्या आतून लावून घेतली. या तिघींना पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून आरोपीने एका रूममध्ये बसविले. ५० लाख रुपये खंडणी  मिळाल्याशिवाय तुमची सुटका होणार नाही. पोलिसांना कळविले तर जीव गमवावा लागेल, अशी धमकी आरोपीने दिली. त्यामुळे महिला आणि मुलीची भीतीने गाळण उडाली. रकमेची जमवाजमव करण्यासाठी आरोपीने नातेवाईकांना फोन करण्यास सांगितले. त्यानुसार मुलीने तिच्या काकांना फोन करून या घटनेची माहिती दिली. काकांनी आरोपीला घरातील सदस्यांना काहीही करू नको, तुझी पैशाची व्यवस्था करून देतो, असे सांगून पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, कर्णोपकर्णी ही माहिती परिसरात पोहोचल्याने वैद्य यांच्या घरासमोर अल्पावधीतच बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. पिस्तूल आणी चाकूच्या धाकावर आरोपीने वृद्ध महिला व मुलीला पोलिस ठेवल्याची माहिती कळताच हुडकेश्वर तसेच आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील ताफा बोलवून घेण्यात आला. गुन्हे शाखेचा पोलिस ताफा, शीघ्र कृती दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले.

आरोपीला पैसे घेण्याच्या बहाण्याने बाहेर काढण्याचे पोलीसांनी प्रयत्न केले. मात्र तो खिडकीतूनच पैशाची मागणी करीत होता. पोलिसांनी कशीबशी शक्कल लढवून त्याला पकडले आणि नंतर बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर त्याची बेदम धुलाई करण्यात आली. यावेळी बघ्यांचा मोठा जमाव त्याच्याकडे धावला. मात्र, जमावाला पिटाळून पोलिसांनी त्याला आपल्या वाहनात घातले. त्याला हुडकेश्वर ठाण्यात नेऊन त्याची पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असतानाच हजारावर नागरीक पोलीस ठाण्याच्या समोर जमले. जमाव ठाण्यात शिरल्यास मोठा गुन्हा घडू शकतो, हे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी त्याला तेथून मेडिकलच्या बहाण्याने त्याला गुन्हेशाखेत नेले. वृत्त लिहिस्तोवर तेथे त्याची चौकशी सुरू होती.

दोन तासानंतर सुटकेचा निश्वास आरोपीने तब्बल दोन तास वृद्ध महिला आणि मुलीला ओलीस ठेवले.तो वारंवार त्यांच्या जिवाला धोका पोहचविण्याची धमकी देत होता. दोन तासानंतर त्याला पोलिसांनी बाहेर काढले. घरातील कोणत्याही महिला-मुलीला कसलीही दुखापत झाली नसल्याचे कळाल्यानंतर पोलिसांसकट सर्वांचाच जीव भांड्यात पडला आणि या नाट्यमय घटनेवर पडदा पडला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसExtortionखंडणीWomenमहिलाArrestअटक