शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

डीजी सुबोध जायसवाल बनणार दिल्लीचे पोलीस आयुक्त ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 23:30 IST

निवड समितीच्या यादीत आघाडीवर; प्रतिनियुक्तीबाबत गुरुवारी घोषणा होणार

ठळक मुद्देजायसवाल यांनीही पद स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येतेत्यांच्यासह दिल्लीतील महासंचालक एन.एन. श्रीवास्तव यांचे नाव चर्चेत आहे.तत्कालिन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची इच्छा असूनही जायसवाल तेथून हलवून राज्य पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करावी लागली होती.

जमीर काझीमुंबई - गेल्या अकरा महिन्यापासून राज्याच्या पोलीस प्रमुखपदाची धुरा सांभाळत असलेल्या सुबोध जायसवाल यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दिल्लीचेआयुक्त अमूल पटनायक येत्या ३१ जानेवारीला निवृत्त होत असून त्यांच्याजागी जायसवाल यांना प्रतिनियुक्तीवर पाचारण केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यासह दिल्लीतील महासंचालक एन.एन. श्रीवास्तव यांचे नाव चर्चेत आहे.

सेवाजेष्ठता व केंद्र सरकारशी असलेल्या सलगीमुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली जाणार असून जायसवाल यांनीही पद स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. सुबोध जायसवाल हे १९८५ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी असून गेल्या २८ फेब्रुवारीपासून राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कारभार आठ महिने सांभाळला होता. त्यांना आणखी काही काळ आयुक्तपदी रहावयाचे होते, मात्र तत्कालिन पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांना दोन वर्षाची मुदतवाढ देण्यास केंद्राने नकार दिला. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची इच्छा असूनही जायसवाल तेथून हलवून राज्य पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करावी लागली होती.

दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपा-सेनेचे सरकार जावून सेना व काँग्रेस आघाडीची महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक समीकरणे बदलली आहेत. फडणवीस यांच्या विशेष मर्जीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना टप्याटप्याने महत्वाच्या पदावरुन बाजूला केले जाणार आहे. त्याची सुरवात गेल्या आठवड्यापासून झालेली आहे. या परिस्थितीमध्ये दिल्लीतील पोलीस आयुक्त पटनायक हे ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत. मुदतवाढीसाठी ते प्रयत्नशील असलेतरी दिल्लीत जामिया, जेएनयू विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेली अमानुष मारहाण, हिंसक मोर्चे रोखण्यातील अपयशामुळे सर्वस्तरावरुन टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे नियुक्तीसाठी त्यांच्याच १९८५ च्या आयपीएस बॅचमधील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय गृह विभागाने नव्या आयुक्तपदासाठी निश्चित केली असून त्यामध्ये सुबोध जायसवाल यांचे नाव आघाडीवर आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकापेक्षा दिल्लीचे पोलीस आयुक्तपद प्रतिष्ठेचे असल्याने त्यांनी त्याला पसंती दर्शविली आहे. केंद्राकडून त्यांची निवड झाल्यास ते महत्वाचे पद असल्याने राज्य सरकारही त्यामध्ये अडकाठी करणार नाही, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्ट केले.जायसवाल यांना प्रतिनियुक्त का फायद्याची?* केंद्रातील प्रतिनियुक्तीवरुन मुंबईच्या आयुक्तपदी पदभार घेताना सुबोध जायसवाल यांना दोन वर्षे कार्यभार मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना आठ महिन्यात तेथून बाहेर पडावे लागले.* राज्यातील सत्ता बदलामुळे राज्य सरकारशी अनेक मुद्याबाबत मतभेद होण्याची शक्यता तर त्याच्या तुलनेत केंद्र सरकार सलगीमुळे दिल्लीच्या आयुक्तपदावरुन दडपणाविना काम करण्याची संधी, तसेच सप्टेंबर२०२२ मध्ये निवृत्ती असल्याने दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर तेथून आयबी किंवा सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्तीची संधी आणि त्यासाठी दिल्लीत राहून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात राहता येणे सोयीचे ठरणार आहे.संजय पांण्डये ठरणार सर्वात जेष्ठ महासंचालकसुबोध जायसवाल यांची जर दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी प्रतिनियुक्ती झाल्यास राज्य पोलीस दलात होमगार्डचे महासमादेशक संजय पांण्डये सर्वात जेष्ठ अधिकारी ठरणार आहेत. कोणाचीही भीडभाड न ठेवता धडाडीने काम करणारे अशी ओळख असलेल्या पांण्डये यांना फडणवीस सरकारच्या काळात जाणीवपूर्वक डावलण्यात आले होते. त्यांची सेवा जेष्ठता अन्यायी पद्धतीने २ वर्षे१० महिन्याने कमी करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र उच्च न्यायालयाने फटकार लगावित तो रद्द केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पोलीस महासंचालकाच्या नियुक्तीचे नामांकन निश्चित होईपर्यत सरकारला त्यांच्याकडे पदभार द्यावा लागेल. पुर्णवेळ नियुक्ती झाल्यास ते जून २०२२ पर्यत या पदावर राहू शकतील. त्यांच्यानंतर मुंबईचे आयुक्त संजय बर्वे यांचा क्रमांक असलातरी ते त्यांची मुदतवाढ २८ फेबु्रवारीला संपत आहे. त्यामुळे त्यानंतर पोलीस गृहनिर्माण विभागाचे कार्यकारी संचालक बिपीन बिहारी, सुरेंद्र पांण्डये (सुधार सेवा), के. कनकरत्नम (सुरक्षा महामंडळ), हेमंत नागराळे (विधी व तंत्रसेवा) यांचा क्रमांक लागतो. 

प्रतिनियुक्तीबाबत माहिती नाहीदिल्लीच्या आयुक्तपदी प्रतिनियुक्तीबाबत अद्याप आपल्याला केंद्राकडून काहीही कळविण्यात आलेले नाही. माहिती नसल्याने त्यामुळे त्याबाबत सध्या काही बोलू शकत नाही. - सुबोध जायसवाल ( पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य)

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तMumbaiमुंबईdelhiदिल्लीHome Ministryगृह मंत्रालय