शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे दोन प्रियकर आणि पतीच्या एका प्रेयसीचा झाला आमना-सामना, भांडणात एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 14:55 IST

तपासातून समोर आलं की, जखमी महिला बसंती रैगर, गंगापूर शहरात राहणारी आहे. ती तिचा पती कन्हैया रैगर आणि मुलांसोबत मुहाना मंडी भागात राहत होती.

जयपूरच्या मुहानामध्ये प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या तेव्हा झाली जेव्हा एका महिलेचे दोन वेगवेगळे प्रियकर, महिलेचा पती आणि पतीची प्रेयसी यांचा आमना-सामना झाला. वैयक्तीत भांडणादरम्यान एका महिला गंभीरपणे जखमी झाला. तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

पोलीस अधिकारी लखन सिंहने सांगितलं की, मंगळवारी सकाळी साधारण ६ वाजता मुहाना मंडी भागात रामझन शर्माच्या चहाच्या गाडीजवळ एक जखमी महिला आणि एक पुरूष असल्याची सूचना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांनाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यावेळी डॉक्टरांनी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. तर गंभीरपणे जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. (हे पण वाचा : 'मी तुझ्यासाठी जीवही देऊ शकतो'...म्हणत प्रेयसीसमोर प्रियकराने घेतला गळफास)

तपासातून समोर आलं की, जखमी महिला बसंती रैगर, गंगापूर शहरात राहणारी आहे. ती तिचा पती कन्हैया रैगर आणि मुलांसोबत मुहाना मंडी भागात राहत होती. सोमवारी रात्री उशीरा बसंतीचा एक प्रियकर मुकेश शर्मा मुहाना येथे आला. यादरम्यान बसंतीचा दुसरा प्रियकरही मोहनया धाकडही तिथे आला. तर बसंतीचा पती कन्हैयाची एक प्रेयसी कमली बावरिया सुद्धा त्याचवेळी मंडी परिसरात आली होती.

हे सगळे लोक दारूच्या नशेत होते आणि सगळे एकत्र एकाच ठिकाणी समोरा-समोर आल्याने त्यांच्यात वाद पेटला. भांडणादरम्यान बसंती गंभीरपणे जखणी झाली आणि तिचा एक प्रियकर मोहनया धाकड याचा मृत्यू झाला. पोलिसांना तपासादरम्यान जखमी महिला बसंतीचा पती कन्हैया आणि त्याची प्रेयसी कमली बावरिया हे नशेत असल्याचं दिसलं. त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

त्यांच्याकडे जखमी महिला बसंतीची २ वर्षीय मुलगीही आढळली. तिला पोलिसांनी देखरेखीसाठी चाइल्ड हेल्पलाइनकडे सोपवलं आहे. पोलिसांनी मृत मोहनयाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये ठेवला आहे. ते जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. पोलीस कन्हैया कुमार आणि कमलीची चौकशी करत आहे. तर बसंतीचा दुसरा प्रियकर मुकेश शर्मा याचा पोलीस शोध घेत आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी