शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:20 IST

पत्नीने आपल्या भावाला आणि साडूला बोलावून पतीला बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या पतीवर सध्या बेगुसराय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बिहारमधील बेगुसराय येथील एका विचित्र घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका पतीने आपल्या पत्नीचा फोटो साडूच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर पाहिला आणि तो संतप्त झाला. पतीने जेव्हा याबद्दल पत्नीला विचारणा केली, तेव्हा पत्नीने आपल्या भावाला आणि साडूला बोलावून पतीला बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या पतीवर सध्या बेगुसराय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारहाण झालेल्या पतीचे नाव अशोक महतो (रा. नागदह, वार्ड नंबर ११, बेगुसराय) असे आहे. त्याने आरोप केला की, "माझ्या पत्नीचे तिच्या बहिणीच्या पतीसोबत अनैतिक संबंध आहेत, म्हणूनच ती मला वारंवार धमकावते. इतकेच नाही, तर याला विरोध केल्यावर मेव्हणा आणि साडूने मला मारहाण करून गंभीर जखमी केले."

अशोक महतोने सांगितले की, त्याची पत्नी वारंवार तिच्या बहिणीच्या पतीसोबत व्हॉट्सॲप कॉलवर बोलत असते. एवढेच नव्हे, तर साडूने त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर आपल्या पत्नीचा फोटो लावला होता, ज्याला त्याने विरोध केला होता.

पत्नीचे अनैतिक संबंध आणि मारहाणीचा प्रकारपीडित पतीने पुढे आपबिती सांगितले की, दीड महिन्यांपूर्वी त्याची पत्नी तिच्याबहिणीच्या नवऱ्यासोबत व्हॉट्सॲपवर बोलत असताना त्याने पाहिले आणि त्याला विरोध केला. यावर संतापलेल्या मेव्हण्याने त्याच्याकडे आपले दोन हजार रुपये थकीत असल्याचे सांगितले आणि तेच निमित्त साधून त्याला मारहाण केली.

विरोध केल्यावर साडू आणि मेव्हण्याकडून मारहाणअशोक महतोने सांगितले की, जेव्हा साडूकडून त्याला मारहाण झाली, तेव्हा त्याच्या मेहुण्यानेही त्याला मारहाण केली. अशोक महतो म्हणाले की, "माझ्या पत्नीचे तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध आहेत. माझ्या साडूचे घर जवळच आहे. कोणताही वाद झाला की, माझी पत्नी लगेच त्याच्या घरी पळून जाते. पत्नीला काही बोलल्यास साडू थेट आमच्या घरी येऊन मारहाण करतो आणि धमक्या देतो. यामुळेच माझ्या पत्नीचेही मनोधैर्य वाढले आहे आणि तीही मला धमकावत असते."

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार