शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे फायनान्सरसोबत अनैतिक संबंध; पतीने कुटुंबासह कार नदीत कोसळवली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 09:48 IST

जसविंदर सिंह याने त्याच्या पत्नीवर अनैतिक संबंधांचे आरोप केले आहेत. कार चालवत असताना त्याने व्हिडीओ बनविला आहे, यात तो रडताना दिसत आहे.

पंजाबमध्ये कुटुंबासह आत्महत्येचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फिरोजपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून मुलगी, पुतण्या, भावासह कार भरधाव वेगाने नदीत कोसळविली. यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला असून पोलिसांनी कार आणि मृतदेह बाहेर काढले आहेत. आत्महत्या करण्याचपूर्वीच्या त्याच्या व्हिडीओने खळबळ उडाली आहे. 

जसविंदर सिंह याने त्याच्या पत्नीवर अनैतिक संबंधांचे आरोप केले आहेत. कार चालवत असताना त्याने व्हिडीओ बनविला आहे, यात तो रडताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे या चौघांनाही आपण आत्महत्या करण्यासाठी जातोय हे माहिती होती. एका फायनान्सरसोबत त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे आरोप जसविंदरने केले आहेत. त्याची सासू आणि मेहुणी संसार करायला देत नाहीत, असाही आरोप त्याने केला आहे. 

जसविंदरच्या कारमध्ये मोठा भाऊ हरप्रीत सिंह, मुलगी गुरलीन कौर आणि पुतण्या अगम हे होते. घलखुर्द जवळ नदीवर येताच जसविंदरने कार नदीच्या पाण्यात कोसळवली. स्थानिक लोकांच्या कार पाण्यात पडल्याचे लक्षात आले त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी कार बाहेर काढली तोवर या साऱ्यांचा मृत्यू झाला होता. या व्हिडीओमध्ये मुलांनीही आपल्याला जगायचे नाहीय, असे म्हटले आहे. 

जसविंदरच्या भावाने देखील या व्हिडीओत त्याच्या वहिनीबद्दल सांगितले आहे. त्याची वहिनी काला संधू नावाच्या फाय़नान्सरसोबत राहतेय. त्याने तिला वेगळी खोली घेऊन दिली होती. जसविंदरने काला संधूला फोन करून पत्नीला परत पाठविण्याची विनंती केली होती. आईविना मुले अनाथासारखी राहत आहेत, असे म्हटले होते. यावर संधूने रागावून जसविंदरला शिवीगाळ केली होती. गेल्या तीन वर्षांपासून ती संधूसोबत राहत होती.  

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी