शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अशीही फसवणूक! पत्नी लाखो रूपये घेऊन परदेशात गेली, पतीचा फोन उचलणंही केलं बंद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:01 IST

पीडित पतीचं नाव मनवीर सिंह मंड आहे. लोहतबड्डी गावात राहणाऱ्या मंडने २०१९ मध्ये लालटन कला गावातील गुरकमल कौरसोबत लग्न केलं होतं.

पंजाबमध्ये एका व्यक्तीला त्याच्याच पत्नीने कथितपणे फसवलं आणि त्याचे पैसे घेऊन परदेशात गेली. ती पतीसोबत देशाबाहेर सेटल होण्याचा प्लॅन करत होती. पण पत्नीने परदेशात पोहोचल्यावर आपल्या पतीला फोन करणं किंवा त्याच्या फोनला उत्तर देणंच बंद केलं. तेव्हा पतीला संशय आला आणि त्याने पोलिसात तक्रार दिली. रिपोर्टनुसार, या व्यक्तीला त्याच्या पत्नीने आणि सासरच्या लोकांना भडकवलं होतं. 

पीडित पतीचं नाव मनवीर सिंह मंड आहे. लोहतबड्डी गावात राहणाऱ्या मंडने २०१९ मध्ये लालटन कला गावातील गुरकमल कौरसोबत लग्न केलं होतं. त्याच्या सासरचे परमजीत सिंह आणि सुरिंदर कौर व पुष्पिंदर सिंह यांनी पीडित व्यक्तीला फसवलं. (हे पण वाचा : खुलासा! डॉक्टरची पत्नी आणि जिम ट्रेनरमध्ये काय होतं नातं? ११०० झालं होतं बोलणं...)

मंड याने सांगितलं की त्याने त्याच्या पत्नीच्या व्हिसासाठी भरपूर पैसा खर्च केला होता. गुरकमलची कॉलेज फी, लॅपटॉप आणि विमानाचं तिकीटही त्याने घेऊन दिलं होतं. मात्र, जशी गुरकमल परदेशात पोहोचली तिने मंड याचा फोन उचलणंच बंद केलं.

हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, पत्नीने फोन उचलणं बंद केल्यावर हैराण झालेल्या मंडने आपल्या परिवाराला संपर्क केला आणि सासरच्या लोकांकडून पैसे परत मागण्यास सांगितलं. पण आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर मंड याने एक सप्टेंबरला पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार दिली.

नंतर दोन्ही पक्षात वाद सोडवण्यात आला आणि आरोपी पीडित व्यक्तीला १५ लाख रूपये देण्यास तयार झाले. मात्र, आरोपींनी केवळ ७ लाख रूपये परत दिले. त्यामुळे मंडने त्यांच्या विरोधात आणखी एक नवीन तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील कारवाई सुरू आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी