शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: मित्रांनी घात केला! पत्नी केक कापण्यासाठी वाट पाहत होती, लग्नाच्या वाढदिनीच नगरसेवकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 20:14 IST

पोलिसांनी पाच आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. तसेच आतापर्यंत दोघांनाच अटक करण्यात आली आहे. या हत्येचा १३ सेकंदांचा लाईव्ह व्हिडीओ देखील समोर आला आहे. 

ग्वाल्हेर : ग्वाल्हेरमध्ये बुधवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे नगरसेवक शैलेन्द्र कुशवाह यांचा लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून खून करण्यात आला. हा खून त्यांच्याच मित्रांनी केला असून लग्नाच्या वाढदिनीच हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

कुशवाह हे मुरार कँटोमेंट वॉर्डमधून नगरसेवक होते. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. कुशवाह यांच्या कुटुंबीयांनी आरोपींची घरे तोडण्याची मागणी करत पोलीस ठाण्याला घेराव घातला, तसेच रस्ताही अडविला होता. 

कुशवाह यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. बुधवारी रात्री ते घरी आले होते, पत्नीकडे केक आणि मुलांसाठी जेवण देऊन मित्रांसोबत बाहेर गेले होते. यावेळी त्यांचा खून करण्यात आला. पोलिसांनी पाच आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. तसेच आतापर्यंत दोघांनाच अटक करण्यात आली आहे. या हत्येचा १३ सेकंदांचा लाईव्ह व्हिडीओ देखील समोर आला आहे. कुशवाह हे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक होते. राज्यमंत्री भारत सिंह कुशवाह यांचा समर्थक होता. शैलेन्द्र यांची पत्नी राधा यांनी सांगितले की, बुधवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. मुलांना खायला आणून देऊन ते येतो असे सांगून गेले. परंतू परतलेच नाहीत. काही लोकांनी त्यांना काठ्यांनी मारहाण केली, रात्री अडीज वाजता त्यांचा मृत्यू झाला. 

कुशवाह यांचा विक्की नावाचा मित्र होता. त्याचाही बुधवारीच वाढदिवस होता. त्याने पार्टी ठेवली होती. तो कुशवाह यांना सोबत घेऊन गेला होता. रात्री त्यांच्यावर जिवघेणा हल्ला झाल्याचे समजले. राजेश शर्मा हा सकाळपासून कुशवाह यांच्यासोबत होता, असे तिने सांगितले. शैलेंद्र यांचा भूरा तोमर याच्याशी तीन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. ते बोलत नव्हते. दोन दिवसांपूर्वीच शैलेंद्र यांनी त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली होती. मी केक कापण्यासाठी वाट पाहत होती. तसे ते १२ नंतरच घरी येतात. परंतू १२.३० वाजता त्यांना त्यांचे मित्र मारत असल्याचा फोन आला आणि सारे संपले, असे राधा यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपा