शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:01 IST

गोवर्धनचे लग्न सात वर्षांपूर्वी प्रिया नावाच्या महिलेशी झाले होते. या जोडप्याला दोन मुले देखील आहेत. मात्र, त्याची पत्नी प्रिया हिला वाईट सवय होती.

रामनगरम जिल्ह्यातील अग्रहारा गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीच्या सततच्या घराबाहेर जाण्याच्या सवयीला कंटाळून आत्महत्या केली आहे. मृताचे नाव गोवर्धन (वय अंदाजे ३२) असून, त्याने आपल्या राहत्या घरात पंख्याला लटकून जीवन संपवले.

समोर आलेल्या माहितीनुसार, गोवर्धनचे लग्न सात वर्षांपूर्वी प्रिया नावाच्या महिलेशी झाले होते. या जोडप्याला दोन मुले देखील आहेत. मात्र, पत्नी प्रिया हिला वाईट सवय होती. गोवर्धनची पत्नी प्रिया त्याला न सांगता किंवा काहीही विचारता वारंवार घराबाहेर जायची. तिच्या या सवयीमुळे गोवर्धन अत्यंत नाराज आणि त्रस्त होता. त्याने अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा स्वभाव बदलला नाही. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, प्रिया एक महिन्यापूर्वीही घराबाहेर गेली होती. या सगळ्याला कंटाळून गोवर्धनने हे टोकाचे पाऊल उचलले.

एकाच इमारतीत राहत होते संपूर्ण कुटुंब

गोवर्धन आपल्या कुटुंबासह एकाच इमारतीत राहत होता. त्याची आई तळमजल्यावर राहत होती, तर गोवर्धन आणि प्रिया तिसऱ्या मजल्यावर राहत होते. पत्नी घराबाहेर गेल्यानंतर गोवर्धन एकटाच त्या घरात राहत होता. ८ जून रोजी गोवर्धनच्या आईने त्याला जेवण आणून दिले. मात्र, गोवर्धनने ते जेवण करण्यापूर्वीच आपले आयुष्य संपवले.

कुटुंबाने दरवाजा उघडला अन्... 

९ जून रोजी संध्याकाळपर्यंत गोवर्धन घरातून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी त्याच्या घरी जाऊन बघण्याचा विचार केला. घरचा दरवाजा उघडताच तो पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. गोवर्धनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी व्हिक्टोरिया रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

प्रिया अजूनही गायब

गोवर्धनच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूसाठी त्याची पत्नी प्रियाला जबाबदार धरले आहे. या घटनेमुळे गोवर्धनच्या कुटुंबावर आणि दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, प्रियाचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूKarnatakकर्नाटक