शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सपासप वार करून पत्नीला नराधम पुजारी पतीने जिवंत जाळले; कारण ऐकून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 21:14 IST

Wife was burnt alive by her priest husband : पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळेच त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

ठळक मुद्देमिळालेल्या माहितीनुसार, पुजारी रामायण पांडे (३५) याने पत्नी मंदाकणी पांडे (२५) यांच्या चारित्र्यावर संशय घेतला होती.

छत्तीसगडमधील बलौदा बाजार भागात काळीज पिळवटून टाकणारी ही घटना समोर आली आहे. छत्तीसगडच्या भाटापारा येथील सिद्धबाबा येथील साई मंदिराच्या पुजारीने आपल्या पत्नीला जिवंत जाळले. काल रात्री 9 ते 10 च्या दरम्यान ही घटना घडल्याचं सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुजारी रामायण पांडे (३५) याने पत्नी मंदाकणी पांडे (२५) यांच्या चारित्र्यावर संशय घेतला होती. या कारणास्तव त्याने प्रथम आपल्या पत्नीला धारदार शस्त्राने जखमी केले, नंतर गॅसच्या शेगडीच्या आगीने तिला जिवंत पेटवून दिले.पोलीस ठाण्याचे प्रभारी भाथपारा रोशनसिंह राजपूत यांनी सांगितले की, पुजारी रामायण पांडे याने पत्नीला मंदिराच्या आवारातील खोलीत बंद केले आणि तिला गॅस शेगडीच्या आगीने पेटवून दिले. तो सकाळपासून पत्नीला मारहाण करत होता आणि तिला धारदार शस्त्राने जखमी केले होते.

घटनेच्या दिवशी सकाळपासूनच रामनारायण आणि मंदाकिनी यांच्यात वाद होत होते. त्यानंतर या पुजाऱ्याने पत्नीला बेदम मारहाण केली. दुपारपर्यंत तो पत्नीला मारहाण करत होता. त्यानंतर काही कामासाठी तो बाहेर गेला. रात्री नऊ वाजता तो परत घरी आला. घरी आल्यावर त्याने पुन्हा पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. हातात येईल ती गोष्ट घेऊन तो पत्नीवर सपासप वार करत राहिला. यामुळे अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या पत्नीच्या अंगावर त्याने पेटलेली गॅस शेगडी ठेवली. त्यामुळे तिच्या कपड्यांनी आणि अंथरुणाने पेट घेतला. घरात त्यावेळी मेहुणा, मेहुणी आणि लहान मुलं होती. त्यांनी पुजाऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणी मध्यस्थी केली तर त्याला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून पुजारी रामायणविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळेच त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिस