शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:39 IST

पती रात्री दारू पिऊन घरी आला, त्याने पत्नीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, पत्नीने याला नकार दिला. यानंतर पतीने जे केले ते ऐकून कुणाचाही संताप होईल.

नशेत अनेकदा माणूस काय करतोय, याची त्याला अजिबात कल्पना नसते. मध्य प्रदेशातील भिंडमधून असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे एका पतीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीची हत्या केली. पती रात्री दारू पिऊन घरी आला, त्याने पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, पत्नीने याला नकार दिला आणि ती झोपायला गेली. यानंतर चिडलेल्या पतीने मोबाईलचा कॅमेरा चालू करून रेकॉर्डिंग सुरू केली आणि तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला. पत्नीने विरोध केला असता पतीने तिचा गळा आवळून खून केला.

रात्रभर मृतदेहाशेजारीच झोपला

पती दारूच्या इतक्या नशेत होता की, त्याला आपण काय केले आहे, याची जाणीव नव्हती. तो रात्रभर पत्नीच्या मृतदेहाशेजारीच पलंगावर झोपून राहिला. सकाळी जेव्हा त्याला जा आली आणि नशा उतरली, तेव्हा त्याला आपल्या कृत्याची लाज वाटली. "मी हे काय केले?" असे म्हणत तो मोठमोठ्याने रडू लागला. त्यानंतर तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आणि पोलिसांसमोर शरणागती पत्करली. "साहेब! मला अटक करा, मी दारूच्या नशेत माझ्याच बायकोला मारून टाकले आहे," असे तो म्हणाला.

पोलीसही थक्क झाले!

त्याचे बोलणे ऐकून पोलीसही थक्क झाले. नंतर ते पतीसोबत त्याच्या घरी पोहोचले. तिथे खरंच महिलेचा मृतदेह पलंगावर पडलेला होता. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि आरोपी पतीला अटक केली. सध्या या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे.

गळ्यावर पाय ठेवून केली हत्याहे प्रकरण ऊमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुलेह गावातील आहे. गुरुवारी रात्री तीन वाजता जबरसिंग दारूच्या नशेत धुंद होऊन घरी पोहोचला. त्याने पत्नीला संबंध ठेवण्यास सांगितले. पत्नीने विरोध केला, परंतु आरोपीने मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू करून पत्नीसोबत जबरदस्ती सुरू केली. पत्नीने त्याला ढकलून दिले असता, जबरसिंगने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत आरोपीने पत्नीला आधी बेदम मारहाण केली आणि नंतर तिच्या गळ्यावर पाय ठेवून तिची हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी दारूच्या नशेत तिच्या शेजारीच पलंगावर झोपला. सकाळी त्याची झोप उघडली, तेव्हा पत्नी मृतावस्थेत पडलेली होती. त्याने ही घटना आपल्या वडिलांना सांगितली आणि स्वतःच पोलीस ठाण्यात पोहोचला.

चार महिन्यांपूर्वीच झाले होते लग्नमृत तरुणीचे लग्न १० फेब्रुवारी रोजी पुलेह येथील भारत जाटव यांचा मुलगा जबरसिंग जाटव याच्याशी झाले होते. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत असत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गुरुवारी माहेरकडील लोक तिथे पोहोचले. मृत महिलेचा भाऊ, दीपू जाटव याने आरोप केला की, "माझ्या बहिणीला तिच्या पती आणि सासू-सासऱ्यांनी मिळून मारले आहे." मृतदेहाची एक बोट कापली होती आणि चेहऱ्यावरही जखमांच्या खुणा होत्या, असेही त्याने सांगितले.

पती आणि सासऱ्याविरोधात एफआयआरया संपूर्ण प्रकरणावर ऊमरी पोलीस ठाण्याचे टीआय शिवप्रताप सिंह कुशवाह यांनी सांगितले की, रात्री पतीनेच महिलेची हत्या केली आहे. माहेरकडील लोकांच्या तक्रारीवरून पती आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार