सुपे : अनैतिक संबंधातून पत्नीनेच पतीचा खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील सुपे नजीक असणाऱ्या चोरमलेवस्तीवर घडली. गेल्या दहा दिवसांपूर्वी साप चावल्याची बतावणी करुन पत्नी व प्रियकराने अंत्यविधी केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच खून केल्याची माहिती समोर आली. यासंदर्भात आरोपी पत्नी रुपाली कामा मदने आणि प्रियकर दादा कामा महानवर (रा. पाटस, ता. दौंड) यांनी कामा बापू मदने यांची तोंड दाबून अवघड जाग्यावर मारुन हत्या केली. या प्रकरणी आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. दोघांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावन्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. भोंडवेवाडी गावच्या हद्दीत दत्तात्रय भोंडवे यांच्या शेतात बकरीबसण्यासाठी होती. यावेळी पत्नीच्या अनैतिक संबंधात पती कामा बापू मदने यांचा अडथळा होत होता. त्यामुळे पत्नीने प्रियकरासोबत पती कामा मदने यांचे तोंड दाबून तसेच लाथा मारुन जीवे मारले.मात्र, पती कामा यास सर्प चावल्याचा बनाव करुन पत्नी व प्रियकराने अंत्यविधी उरकण्यास सांगुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा संशय कामाचा रामा बापू मदने यास आला.त्यामुळे त्याने पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पत्नी व प्रियकराचे मोबाईल ‘टॅप’ करुन या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन कसुन चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बारामतीचे विभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या आरोपींना कलम ३०२, २०१ आणि ३४ या प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास सपोनी सोमनाथ लांडे करीत आहेत.———————————
अनैतिक संबंधातून पत्नीने केला पतीचा खून, बारामती तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 19:56 IST
पतीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची बतावणी करत अंत्यविधी उरकून टाकला..
अनैतिक संबंधातून पत्नीने केला पतीचा खून, बारामती तालुक्यातील घटना
ठळक मुद्देपोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा केला कबूल