शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! 3 मुलांची आई पतीला सोडून पळून गेली, 20 वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत राहिली अन् आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 17:13 IST

तीन मुलांची आईने 20 वर्षे लहान बॉयफ्रेंडसाठी आपल्या पतीला सोडलं त्यानंतर ती त्याच्यासोबत पळून गेली. मात्र आता एक भयंकर घटना समोर आली आहे.

तीन मुलांच्या आईने 20 वर्षे लहान बॉयफ्रेंडसाठी आपल्या पतीला सोडलं त्यानंतर ती त्याच्यासोबत पळून गेली. मात्र आता एक भयंकर घटना समोर आली आहे. नाल्यामध्ये या महिलेचा मृतदेह सापडला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मीना अहिरवार ही महिला 50 वर्षांची होती. तिला तीन मुलं आहेत. ती पती उत्तम आणि मुलांना सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. त्यानंतर ती त्याच्याच सोबत राहू लागली. 

मीनाच्या बॉयफ्रेंडचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाला. अशा परिस्थितीत मीना एकटी पडली.त्यानंतर ती तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत राहू लागली. त्याच्यामध्ये आणि मीनामध्ये खूप भांडणं व्हायची. मीना गैरकृत्यांमध्ये सहभागी असल्याचेही म्हटले जात आहे. याच दरम्यान 11 फेब्रुवारी रोजी प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नाल्यात मीनाचा मृतदेह पोत्यात सापडल्याने खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पालकांनी मीनाचं लग्न ललितपूर जिल्ह्यातील महरौनी येथील उत्तम याच्याशी करून दिलं होतं. तिला अभिषेक, संगीता आणि लखन ही तीन मुलं आहेत. तिन्ही मुलं विवाहित आहेत. याच दरम्यान मीना महरौनी येथे राहणाऱ्या राजकुमाराच्या प्रेमात पडली. त्यानंतर ती तीन मुलं आणि पती उत्तमला सोडून राजकुमारसोबत पळून गेली. पण कोरोनाच्या काळात तिचा प्रियकर राजकुमारचा मृत्यू झाला. 

राजकुमारच्या मृत्यूनंतर मीना एकटी पडली. मधल्या काळात तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या मुलाशी तिची मैत्री झाली. ती त्याच्यासोबत राहत होती. मीनाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी सांगितलं की, रोज ती कामावर जात असल्याचं सांगून घरातून निघून जायची. पण ती कोणतं काम करायची हे कोणालाच माहीत नाही. शुक्रवारीही ती कामावर जात असल्याचं सांगून घरातून निघून गेली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी