शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! महिलेने दिराच्या मदतीने पतीची केली हत्या, दगडाचे ठेचून घेतला त्याचा जीव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 11:06 IST

पोलिसांनी दिरासह आरोपी महिलेस अटक केली आहे. हत्येच नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून आरोपींची चौकशी सुरू आहे.

महिलेने दिरासोबत मिळून पतीची हत्या (Wife Killes Husband) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील भोरमधून समोर आली आहे. महिलेनं दिराच्या मदतीनं पतीची दगडानं ठेचून हत्या (murder) केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी दिरासह आरोपी महिलेस अटक केली आहे. हत्येच नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून आरोपींची चौकशी सुरू आहे.

देविका अमोल रांजाळे आणि किरण शंकर रांजाळे अशी अटक केलेल्या महिलेचं आणि तिच्या दिराचं नाव आहे. आरोपी दीर-भावजय यांनी अमोल शंकर रांजाळे याची दगडानं ठेचून हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील जांभूळवाडी येथील रहिवासी असणारा किरण रांजाळे हा काही दिवसांपूर्वी आपली भावजय देविकाला घेऊन भोर तालुक्यातील धानवली याठिकाणी आपल्या बहिणेकडे आला होता. यानंतर रविवारी आरोपी पत्नी देविकाचा पती अमोलही याठिकाणी आला होता. (हे पण वाचा : मालवाहू ऑटोच्या भाड्यावरून चालकाचा खून; चौघांनी केली मारहाण)

दुपारी अडीचच्या सुमारास तिघंही बहिणीच्या घराबाहेर पडले. आपल्या घरी परत येत असताना काही कारणांवरून त्यांच्यात वाद झाला. यामुळे आरोपी पत्नी देविकानं आपला दीर किरण शंकर रांजाळे याच्या मदतीनं आपल्या पतीची हत्या केली. आरोपींनी मृत अमोलची दगडानं ठेचून निर्घृण हत्या केली. यानंतर त्यांनी मृत अमोलचा मृतदेह धानवलीच्या सोनजाई मंदिराजवळ फेकून दिला. (हे पण वाचा : "तुझ्या आईला सांगतो तू सिगारेट ओढलीस!" यावरून पेटलेल्या वादातून अल्पवयीन मुलाने केली हत्या )

गावकऱ्यांना हा मृतदेह दिसल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. तर अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी दीर-भावजय यांना अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे