शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दुसरं लग्न केल्यावर तरूणीचं अपहरण, पोलिसांनी पहिल्या पतीला धरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 12:48 IST

तरूणीने आधी मांगीलासोबत लग्न केलं होतं आणि त्यांच्यात वाद होत असल्याने तीन वर्षाआधीच दोघे वेगळे झाले होते. तरूणीने दोन महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न केलं.

छत्तीसगडच्या टुकराना गावात ८ सप्टेंबरला रात्री उशीरा घरात घुसून एका तरूणीचं अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली. पोलिसांनी केवळ १२ तासात प्रकरणाचा खुलासा केला. तरूणीचं अपहरण करणारा दुसरा कुणी नसून तिचा पहिला पती निघाला. या कृत्यात तरूणीच्या पहिल्या पतीसोबत आणखी चार लोकांचा समावेश होता.

काय आहे भानगड?

दोन महिन्यांपूर्वी २४ वर्षीय मनीषाने अर्जुन नट याच्यासोबतच दुसरं लग्न केलं होतं. ८ सप्टेंबरला रात्री उशीरा एका कारमध्ये काही लोक मनीषाच्या सासरी पोहोचले. तिचे सासरे आणि पतीला त्यांनी मारहाण करत मनीषाला जबरदस्ती कारमध्ये बसवलं. पती आणि सासऱ्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. कुटुंबियांच्या चौकशीच्या आधारावर पोलिसांना समजलं की, तरूणीचा पहिला पती मांगीलाल नट त्याच्या साथीदारांसोबत तिला घेऊन गेला. त्यानंतर पोलिसांनी मांगीलालच्या घरावर  लक्ष ठेवलं. पोलिसांनी पाहून मांगीलाल पळून जात होता. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने तरूणीचा पत्ता सांगितला. (हे पण वाचा : आधी घरात मारलं अन् मग प्रेत पुरलं; पोलीस ठाण्यावर मोर्चा जाताच खुनाचं रहस्य उलगडलं)

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तरूणीची सुटका केली. त्यानंतर मांगीलालसोबतच नारायण, रामबाबू आणि धीरज यांनाही अटक केली. तसेच अपहरणासाठी वापरलेलं वाहनही ताब्यात घेतलं.

का केलं अपहरण?

तरूणीने आधी मांगीलासोबत लग्न केलं होतं आणि त्यांच्यात वाद होत असल्याने तीन वर्षाआधीच दोघे वेगळे झाले होते. तरूणीने दोन महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न केलं. तरूणीने दुसरं लग्न केल्याने पहिला पती संतापला आणि तिच्यासोबत भांडण करू लागला. पहिल्या भांडणावेळी तरूणीच्या वडिलांनी मांगीलाल याला ३० हजार रूपये दिले होते. तरूणीचं दुसरं लग्न होताच मांगीलाल तरूणीच्या दुसऱ्या पतीकडे आणखी पैशांची मागणी करत होता. ते पैसे न मिळाल्याने त्याने तरूणीचं अपहरण केलं.  पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणmarriageलग्न