शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहाचे तुकडे करून टाकल्याप्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीचाही सहभाग उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 19:03 IST

Murder Case : एपीएमसी मधील मृतदेह प्रकरण; मारेकऱ्याच्या इशाऱ्यावरून गेलेली घराबाहेर

ठळक मुद्देमृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर ती घरी आली असता दोन दिवसांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार केलेली. दोन दिवसांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार कोपर खैरणे पोलिसांकडे केली होती. मात्र सुमितकुमार याच्या अटकेनंतर त्याच्याकडून घटनाक्रम समजून घेत असताना पोलीसांना मृत रवींद्रच्या पत्नीवर देखील संशय आला.

नवी मुंबई - उसन्या पैशावरून नातेवाईकाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून टाकल्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी मयत व्यक्तीच्या पत्नीला देखील अटक केली आहे. घटनेवेळी मारेकरूकडून हत्येचा कट रचला जात असताना त्याच्या इशाऱ्यावरून पत्नी मुलांना घेऊन घराबाहेर गेली होती. तर मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर ती घरी आली असता दोन दिवसांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार केलेली. 

एपीएमसी आवारात आढळलेल्या मृतदेहाच्या तुकड्यांवरून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. उसने घेतलेल्या पैशाची मागणी करूनही मिळत नसल्याने त्याने हत्या करून तीन ठिकाणी तुकडे टाकल्याची कबुली दिली आहे. मात्र पोलीसांच्या सखोल तपासात या घटनेला अधिक वेगळे वळण मिळाले आहे. 

मयत व्यक्ती रवींद्र रमेश मंडोटिया (३०) याच्या हत्येची कल्पना त्याच्या पत्नीला होती, व तिच्या संमती नंतरच मारेकरूने रवींद्र याची त्याच्याच घरात हत्या केली. यामुळे पतीच्या हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असल्याने एपीएमसी पोलिसांनी तिला देखील अटक केली आहे. अटक आरोपी सुमितकुमार चौहान हा सतत रवींद्र याच्या घरी असायचा. घटनेच्या दिवशी सुमितकुमार हा रवींद्रच्या हत्येचा कट रचून त्याच्या घरी गेला होता. यावेळी सुमितकुमारच्या इशाऱ्यावरून रवींद्रची पत्नी मुलांना घेऊन घराबाहेर गेली होती. त्यानंतर सुमितकुमार याने रवींद्रला दारू पाजल्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत असताना हत्या केली. यानंतर त्याच ठिकाणी त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर घर स्वच्छ केले.  तर रात्रीच्या वेळी मृतदेहाचे तिन्ही तुकडे घराबाहेर नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी टाकले. या संपूर्ण घटनेची कल्पना त्याच्या पत्नीला असतानाही तिने मौन बाळगले. शिवाय दोन दिवसांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार कोपर खैरणे पोलिसांकडे केली होती. मात्र सुमितकुमार याच्या अटकेनंतर त्याच्याकडून घटनाक्रम समजून घेत असताना पोलीसांना मृत रवींद्रच्या पत्नीवर देखील संशय आला. त्यानुसार शुक्रवारी तिला देखील अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसArrestअटक