शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रात्री 12 वाजता घरी आल्यावर पतीने विचारलं उशीर होण्याचं कारण, संतापलेल्या पत्नीने केला अ‍ॅसिडने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 10:48 IST

UP Crime News : इथे रात्री घरी यायला इतका उशीर का झाला? असं विचारणाऱ्या पतीवर पत्नीने अ‍ॅसिडने हल्ला केला. ज्यामुळे पतीचा चेहरा गंभीरपणे भाजला गेला. पतीने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

UP Crime News : उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातून पती-पत्नीच्या वादाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नी वादातून भांडणं होणं ही काही नवीन बाब नाही. कधी कधी वाद वाढला तर एकमेकांना मारहाणही केली जाते. पण इथे रात्री घरी यायला इतका उशीर का झाला? असं विचारणाऱ्या पतीवर पत्नीने अ‍ॅसिडने हल्ला केला. ज्यामुळे पतीचा चेहरा गंभीरपणे भाजला गेला. पतीने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कोपरगंजची ही घटना आहे. पत्नी रात्री उशीरा घरी आली तेव्हा पतीने तिला उशीरा येण्याचं कारण विचारलं. ज्यानंतर महिला संतापली आणि तिने पतीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकलं. अ‍ॅसिडमुळे पतीचा चेहरा गंभीर भाजला आहे. त्यानंतर त्याला मारहाणही केली. अशात पती नंतर पत्नीविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेला. पोलिसांनी नंतर महिलेला अटक केली. तर पतीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. 

येथील डब्बू गुप्ता शनिवारी रात्री उशीरा जवळपास 3 वाजता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला होता. त्याचा चेहरा भाजलेला होता. डब्बूने सांगितलं की, पत्नी पूनम रात्री 12.30 वाजता घरी आली. त्याने तिला विचारलं की, इतक्या उशीरा कुठून आली. यावर पत्नी पूनम संतापली आणि ओरडायला लागली. त्यानंतर ती आणखी संतापली आणि तिने पतीला मारहाण सुरू केली. आपला बचाव करण्यासाठी पतीने हात-पाय चालवले. वाद इतका वाढला की, पत्नीने पतीला धक्का दिला आणि बाथरूममध्ये ठेवलेली अ‍ॅसिडची बॉटल घेऊन आली. बॉटलचं झाकणं उघडून तिने त्याच्या चेहऱ्यावर ते फेकलं.

हे सगळं झाल्यानंतर डब्बू गुप्ता ओरडत ओरडत घराबाहेर पळाला. त्याला खूप वेदना होत होत्या. कसातरी तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याने पत्नी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसात लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पत्नी पूनमला अटक केली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी