उल्हासनगरात फ्लॅट नावाने करून देण्यासाठी नवऱ्याला दिला प्रियकराच्या मदतीने चोप

By सदानंद नाईक | Updated: February 27, 2023 17:21 IST2023-02-27T17:17:48+5:302023-02-27T17:21:02+5:30

उल्हासनगर - कॅम्प नं-५ साईनाथ कॉलनी परिसरात राहणाऱ्या राधेश्याम तिवारी यांना पत्नी सायरा शेख हिच्या नावाने फ्लॅट करून देण्यासाठी ...

wife beaten husband with the help of his lover to get a flat in Ulhasnagar | उल्हासनगरात फ्लॅट नावाने करून देण्यासाठी नवऱ्याला दिला प्रियकराच्या मदतीने चोप

उल्हासनगरात फ्लॅट नावाने करून देण्यासाठी नवऱ्याला दिला प्रियकराच्या मदतीने चोप

उल्हासनगर - कॅम्प नं-५ साईनाथ कॉलनी परिसरात राहणाऱ्या राधेश्याम तिवारी यांना पत्नी सायरा शेख हिच्या नावाने फ्लॅट करून देण्यासाठी तिच्या प्रियकराने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात पत्नी सायरा शेख, विकास अंकुश नलावडे, अंकुश नलावडे व एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर कॅम्प नं-५ साईनाथ परिसरातील राधेश्याम रामनारायण तिवारी कुटुंबासह राहतात. २४ फेब्रुवारी रोजी पत्नी सायरा शेख हिच्या नावाने फ्लॅट करून देण्यासाठी विकास अंकुश नलावडे, अंकुश नलावडे व एका अज्ञात व्यक्तीने दुपारी तिवारी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी तब्बल दोन दिवसांनी २६ फेब्रुवारी रोजी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पत्नी व तिच्या प्रियकरापासून माझ्या जीवाला धोका असल्याचे आरोप तिवारी यांनी पत्रकार यांच्यासोबत बोलताना दिली. पत्नीसह इतरावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.

Web Title: wife beaten husband with the help of his lover to get a flat in Ulhasnagar