शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:58 IST

हत्येनंतर या दोघांनी मृतदेह प्लास्टिकच्या निळ्या ड्रममध्ये टाकला. त्यावर मीठ आणि चादर टाकून मुलांना घेऊन तिथून पसार झाले.

अलवर - राजस्थानच्या अलवर येथील किशनगड परिसरातील आदर्श नगर कॉलनीत निळ्या रंगाच्या ड्रममध्ये पोलिसांना मृतदेह सापडला. या प्रकरणाचा पोलीस तपासात खुलासा झाला असून मृत हंसराजची पत्नी लक्ष्मीदेवी आणि तिचा प्रियकर जितेंद्र शर्मा या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय दोघांसह ३ मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहे.

खैरथल पोलीस अधीक्षक मनिष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, हंसराजच्या हत्येमागे प्रेम प्रकरण असल्याचं उघड झाले. मृतकाची पत्नी लक्ष्मी आणि जितेंद्र शर्मा या दोघांचे अनैतिक संबंध होते. दोघांनी मिळून हंसराजचा काटा काढण्याचं प्लॅनिंग रचलं. कटानुसार, १५ ऑगस्टच्या रात्री तिघे एकत्रित दारू प्यायला बसले होते. नशेत धुंद हंसराज झोपला होता, तेव्हा जितेंद्र त्याच्या छातीवर बसला आणि उशीने त्याचा चेहरा दाबला. लक्ष्मीने पतीचे दोन्ही पाय पकडले. त्यानंतर श्वास गुदमरल्यामुळे हंसराजचा काही वेळातच मृत्यू झाला असं त्यांनी सांगितले. 

हत्येनंतर या दोघांनी मृतदेह प्लास्टिकच्या निळ्या ड्रममध्ये टाकला. त्यावर मीठ आणि चादर टाकून मुलांना घेऊन तिथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी गाठत तपासाला सुरुवात केली. तेव्हा ड्रममधील मृतदेह हंसराजचा असल्याची ओळख पटली. तपासावेळी पोलिसांना ड्रम, एक धारदार शस्त्र, चादर पुरावा म्हणून सापडले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला होता. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन हाती घेतले. सोमवारी दोन्ही आरोपी रामगडच्या अलवाडा गावात विटभट्टीवर काम मागण्यासाठी पोहचले होते. त्यांच्यावर संशय आल्याने स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलीस तिथे पोहचली तेव्हा दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पाठलाग करत त्यांना अटक करण्यात आली. 

दरम्यान, पोलीस चौकशीत या दोघांनी त्यांचा गुन्हा कबूल केला. पाणी साठवण्याच्या बहाण्याने घरमालकाकडून आरोपी पत्नी लक्ष्मीने ड्रम घेतला होता. अलीकडेच मेरठमध्ये झालेल्या निळ्या ड्रम हत्याकांडातून या दोघांना आयडिया मिळाली होती असं त्यांनी सांगितले. मृत हंसराजच्या तिन्ही मुलांना बाल कल्याण समितीकडे सोपवले आहे. प्रेम प्रकरण आणि अनैतिक संबंधांतून हंसराजची हत्या केल्याचं तपासातून उघड झाले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी