शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सुशांतला ‘ते’ चित्रपट न मिळण्याचे कारण काय? संजय लीला भन्साळी यांची तीन तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 07:36 IST

सुशांतला आॅफर केलेले चार चित्रपट न मिळण्याचे खरे कारण काय? त्याला बॉलीवूडमध्ये ‘बॉयकॉट’ केले होते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न वांद्रे पोलीस करत असून त्या अनुषंगाने भन्साळी यांचा जबाब नोंदवण्यात आला.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी सोमवारी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी सुशांतला आॅफर केलेले चार चित्रपट न मिळण्याचे खरे कारण काय? त्याला बॉलीवूडमध्ये ‘बॉयकॉट’ केले होते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न वांद्रे पोलीस करत असून त्या अनुषंगाने भन्साळी यांचा जबाब नोंदवण्यात आला.भन्साळी यांना गेल्या आठवड्यात वांद्रे पोलिसांनी चौकशी तसेच जबाब नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत समन्स पाठविले होते. शनिवारीच त्यांचा जबाब नोंदविला जाणार होता. मात्र दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे ते ६ जुलै म्हणजे सोमवारी दुपारी ठरल्यानुसार, सव्वाएकच्या सुमारास पोलीस ठाण्यात कायदेशीर सल्लागार व सुरक्षारक्षकासह हजर झाले. तोंडावर मास्क घातलेल्या भन्साळी यांना वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच उत्तर न देता ते थेट चौकशी कक्षात शिरले. पोलिसांनी त्यांना सुशांतशी संबंधित विचारलेल्या १२ ते १५ प्रश्नांची त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह उत्तरे दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.याआधी सुशांत आत्महत्याप्रकरणी २७ जूनला यशराज फिल्म्सची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा हिची चौकशी पोलिसांनी केली.जाणीवपूर्वक डावलले गेले का; तपास सुरूयशराजसोबतच्या तीन चित्रपट करारांची प्रतही पोलिसांनी मिळवली. यशराजसोबत करार झाल्याने भन्साळींच्या ‘गोलियों की रामलीला’ व ‘बाजीराव मस्तानी’साठी सुशांत तारखा देऊ शकला नाही, अशी चर्चा आहे.‘बाजीराव मस्तानी’ दरम्यान सुशांत हा शेखर कपूर यांच्या ‘पानी’साठी काम करत होता. मात्र वर्षभर चित्रपट अडकवून नंतर तो बंद करण्यात आला. सुशांतला जाणीवपूर्वक डावलले गेले का? याचा आत्महत्येशी संबंध आहे का, आदी प्रश्नांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCrime Newsगुन्हेगारीSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळी