शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:32 IST

राजा रघुवंशी याच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला. पण, या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत.

राजा रघुवंशी याच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. पण, अजूनही या प्रकरणात नवीन खुलासे सुरू आहेत. आतापर्यंत या हत्येप्रकरणी राजा रघुवंशीची पत्नी सोनमसह सात जणांना अटक केली आहे. आता आठव्या आरोपीचे नावही समोर आले आहे. पोलिस आता लोकेंद्र तोमर नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. त्याने राजाच्या हत्येनंतर सोनमसाठी ती जिथे राहिली होती तिथे फ्लॅटची व्यवस्था केली होती आणि त्यानेच हत्येचे पुरावे असलेली बॅग जाळण्याच्या सूचना दिल्या असल्याचे समोर आले आहे.

युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी

मिळालेल्या माहितीनुसार, सोनमची बॅग जाळणाऱ्या प्रॉपर्टी डीलर सिलोम जेम्सच्या चॅटमधून एक मोठा खुलासा झाला आहे. जेम्सच्या मोबाईल चॅटमधून लोकेंद्र तोमर नावाच्या व्यक्तीने त्याच्यावर दबाव आणून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. राजा याच्या हत्येनंतर सोनम ज्या ठिकाणी लपली होती तो फ्लॅट देण्यातही लोकेंद्र तोमरची भूमिका असल्याचे समोर आले आहे.

तो व्यक्ती कोण?

मेघालय आणि इंदूर पोलिस लोकेंद्र तोमरचा शोध घेत आहेत. आतापर्यंत त्याची भूमिका समोर आली आहे. त्याने सोनमला लपविण्यासाठी आणि वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तो सिलोम जेम्सचा भागीदार होता असे सांगितले जात आहे. सिलोम जेम्सने पोलिस चौकशीत सांगितले आहे की, त्याने लोकेंद्रसोबत ती इमारत दरमहा तीन लाख रुपये भाड्याने भाड्याने घेतली होती. ते येथे वेगवेगळे भाडेकरू ठेवत होते.

राजची पिस्तूल, दागिने आणि रोख रक्कम लोकेंद्रकडे अस्लयाचे जेम्सने सांगितले होते. सोनमच्या अटकेनंतर त्याने सिलोम जेम्सवर तिच्या सामानाचे शक्य तितक्या लवकर फ्लॅटमधून काढून जाळून टाकण्याचा दबाव आणला होता. राजाच्या हत्येचे महत्त्वाचे पुरावे असल्याने लोकेंद्रला अटक करण्याचा प्रयत्न पोलिसांचे वेगवेगळे पथक करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस