शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील स्फोटकांमागे नक्की कोणाचा हात? ‘जैश’च्या भूमिकेमुळे नवा संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 06:19 IST

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची रविवारी दिवसा मिळालेली माहिती खोटी असल्याचे त्या संघटनेने रात्री स्पष्ट केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची रविवारी दिवसा मिळालेली माहिती खोटी असल्याचे त्या संघटनेने रात्री स्पष्ट केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला. त्यामुळे या स्फोटामागे नक्की कोण आहे, याचा संभ्रम कायम आहे. संंघटनेच्या टेलिग्राम ॲपवरील पेजवरून ही  माहिती देण्यात आली होती. मात्र हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न असल्याचे  सांगत  पाेलिसांनी तिला दुजोरा दिला नव्हता. गुन्हे शाखा तसेच राज्य दहशतवादविरोधी पथक याचा अधिक तपास करत आहेत.

याआधी दिल्लीतील दूतावासाबाहेर झालेल्या स्फोट प्रकरणातही असा दावा केला होता. मात्र तपासात तसा पुरावा हाती लागला नाही. मुंबईतील स्फोटकांप्रकरणी अद्याप दहशतवादी संघटनेचा संबंध समोर आलेला नाही.

लढा संघ-भाजपशी आमचा लढा धर्मनिरपेक्ष लोकशाही, रा. स्व. संघ, भाजपच्या विचारधारेशी आहे. मोदींच्या मुस्लिमविरोधी भूमिकेशी आहे. उद्योगपतींशी नाही, असे सांगत या संघटनेने या स्फोटकांशी असलेला संबंध नाकारला. टेलिग्रामवरील पोस्टबाबत त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणांनाच जबाबदार धरले.

हा फक्त एक ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे!nजैश-उल-हिंदच्या नावे टेलिग्रामवरील संदेशात ‘मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सोडणारा सुरक्षित ठिकाणी पोहोचला आहे. हा फक्त एक ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे’, असे म्हटले होते. nबिटकॉइनच्या स्वरूपात अंबानी यांच्याकडून रकमेची मागणी करीत ‘आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढच्या वेळेस ही कार तुमच्या मुलांच्या मागे असेल’, अशी धमकी त्यात होती. ‘तुम्हाला जमत असेल, तर आम्हाला थांबवून दाखवा’ असे आव्हानही तपास यंत्रणांना दिले होते. मात्र, स्कॉर्पिओमध्ये सापडलेल्या धमकीपत्रात पैशांची मागणी करण्यात आली नव्हती. संघटनेचे हे पेज पोलिसांनी नियंत्रित केले आहे. 

टॅग्स :Jaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदMukesh Ambaniमुकेश अंबानीPoliceपोलिस