शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Anil Deshmukh Arrest: अनिल देशमुखांनी वसुलीचा पैसा नेमका ठेवला कुठे? ईडीला वेगळाच संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 07:01 IST

अनिल देशमुखांशी संबंधित २७ कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरु. देशमुख यांचा या कंपन्यांशी थेट संबंध नसला, तरी त्यांच्यामुळे या कंपन्यांत आर्थिक गुंतवणूक झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या विविध २७ कंपन्या असून, वसुलीतील रक्कम हवालामार्फत त्यात वळविल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. यातील कंपन्या बहुतांश शेल असून, काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी त्यांचा वापर केल्याचे गृहीत धरून तपास सुरू आहे. 

देशमुख यांचा या कंपन्यांशी थेट संबंध नसला, तरी त्यांच्यामुळे या कंपन्यांत आर्थिक गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे या आर्थिक व्यवहारांची माहिती त्यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे १३ आणि नातेवाईक, तसेच जवळच्या मित्रांच्या नावे १४ कंपन्या आहेत. मात्र, अनेक कंपन्यांमध्ये काहीही व्यवसाय नाही. मात्र, त्यांचे अस्तित्व दाखवून काळा पैसा व्यवहारात आणल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.

विरोधात नवे पुरावे नाहीत : परमबीर सिंगमी माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे. आता त्यासंदर्भात मला आणखी काही पुरावे द्यायचे नाहीत, तसेच उलटतपासणीही करायची नाही, असे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी न्या. चांदीवाल यांना २२ ऑक्टोबरच्या सुनावणीत लेखी कळविले होते. त्यामुळे मला आयोगासमोर साक्षीसाठी गैरहजर राहण्याची मुभा द्यावी, असे सिंग यांनी म्हटले होते. आयोगाने यापूर्वी सिंग यांना सातत्याने साक्षीसाठी समन्स बजावले होते. हजर न राहिल्याबद्दल दंडही ठोठावला होता. त्यामुळे याबाबत आता चांदीवाल आयोग कोणती भूमिका घेतो, यावर राज्य सरकारने सुरू केलेल्या या चौकशीचे भवितव्य ठरणार आहे.

दोन चौकशा वेगवेगळ्याचांदीवाल आयोगाच्या चौकशीसोबतच अनिल देशमुख यांची ईडी आणि सीबीआय या केंद्रीय संस्थांमार्फत स्वतंत्रपणे चौकशी सुरू झालेली आहे. त्यातील एका प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. त्या अटकेचा आणि चांदीवाल आयोगाच्या चौकशीचा एकमेकांशी संबंध नसल्याचे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी सांगितले.

 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय